मिया खलिफाचं प्रत्यूत्तर, पैसे मिळेपर्यंत ट्विट करतच राहणार

मुंबई तक

भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची जगभरात चर्चा होतेय. शेतकरी आंदोलनावर जगभरातल्या सेलिब्रेटींकडून ट्विट टाकून पाठिंबा दिला जातोय. रिहाना, मिया खलिफा, अमांडा सर्नी या परदेशी सेलिब्रेटींच्या ट्विटने भारतात खळबळ उडवून दिलीय. यावरून त्यांना ट्रोलही केलं जातंय. मिया खलिफा आणि रिहानाला तर सोशल मीडियावर भयंकर ट्रोल केलं जातंय. पैसे घेऊन शेतकरी आंदोलनाबद्दल बोलत असल्याचे आरोप त्यांच्यावर होत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची जगभरात चर्चा होतेय. शेतकरी आंदोलनावर जगभरातल्या सेलिब्रेटींकडून ट्विट टाकून पाठिंबा दिला जातोय. रिहाना, मिया खलिफा, अमांडा सर्नी या परदेशी सेलिब्रेटींच्या ट्विटने भारतात खळबळ उडवून दिलीय. यावरून त्यांना ट्रोलही केलं जातंय.

मिया खलिफा आणि रिहानाला तर सोशल मीडियावर भयंकर ट्रोल केलं जातंय. पैसे घेऊन शेतकरी आंदोलनाबद्दल बोलत असल्याचे आरोप त्यांच्यावर होत आहेत. ही आरोपबाजी सुरू असतानाही त्यांनी आंदोलनाचं आपलं पाठबळ कायम ठेवलंय.

मिया-अमांडाकडून ट्रोलर्सची मस्करी

मिया खलिफा आणि अमांडा सर्नी यांना यूजर्सनी ट्रोल केलं जातं. पण आपल्याला ट्रोल करणाऱ्यांची त्यांनी मस्करी केली. त्यां ट्रोलर्सचा जोरदार समाचार घेत आहेत. अमांडाने एक ट्विट केलं. त्यात तिने पैसे घेऊन ट्विट करण्याबद्दल आपलं मत मांडलं.

हे वाचलं का?