राज्यमंत्री बच्च कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा, २५ हजारांचा दंड

मुंबई तक

– धनंजय साबळे, अमरावती राज्याचे महिला बालकल्याण आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना चांदूर बाजार न्यायालयाने दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. फ्लॅटबद्दलची माहिती लपवल्याच्या प्रकरणात बच्च कडू यांना दोषी ठरवत चांदूर बाजार प्रथम वर्ग न्यायालयाने हा निकाल दिला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी बच्चू कडू यांनी मुंबई येथे असलेल्या फ्लॅटबद्दलची माहिती प्रतिज्ञापत्रात दिलेली नाही, असा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

– धनंजय साबळे, अमरावती

राज्याचे महिला बालकल्याण आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना चांदूर बाजार न्यायालयाने दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. फ्लॅटबद्दलची माहिती लपवल्याच्या प्रकरणात बच्च कडू यांना दोषी ठरवत चांदूर बाजार प्रथम वर्ग न्यायालयाने हा निकाल दिला.

2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी बच्चू कडू यांनी मुंबई येथे असलेल्या फ्लॅटबद्दलची माहिती प्रतिज्ञापत्रात दिलेली नाही, असा आरोप भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी केला होता. याप्रकरणात त्यांनी 2017 मध्ये बच्चू कडू यांच्याविरोधात तक्रारही दाखल केली होती.

बच्चू कडू यांच्या मालकीचा मुंबईत 42 लाख 46 हजार रुपये किंमती फ्लॅट आहे. मात्र, या फ्लॅटबद्दलची माहिती 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाला दिली नाही, असा आरोप बच्चू कडू यांच्यावर करण्यात आला होता. याच आरोपांवरुन 2017 मध्ये बच्चू कडू यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp