लॉकडाऊनबाबत मंत्री विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य

मुंबई तक

नागपूर: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात सध्या लॉकडाऊन लागू आहे. हा लॉकडाऊन 1 जूनपर्यंत कायम आहे. पण आता लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल केला जाणार असल्याचं मोठं वक्तव्य राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आजच्या (27 मे) मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी केलं आहे. त्यामुळे राज्यात 3 ते 4 टप्प्यांमध्ये सूट दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मात्र, असं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नागपूर: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात सध्या लॉकडाऊन लागू आहे. हा लॉकडाऊन 1 जूनपर्यंत कायम आहे. पण आता लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल केला जाणार असल्याचं मोठं वक्तव्य राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आजच्या (27 मे) मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी केलं आहे. त्यामुळे राज्यात 3 ते 4 टप्प्यांमध्ये सूट दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मात्र, असं असलं तरीही याची अंमलबजावणी कधीपासून केली जाणार याबाबत नेमकी माहिती बैठकीनंतरच समजू शकते.

मंत्रिमंडळ बैठकीआधी बोलताना विजय वड्डेटीवार असं म्हणाले की, ‘राज्यात सध्या कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. राज्यात आता फक्त 12-13 जिल्हेच आहे ज्यांचा रेड झोनमध्ये समावेश आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत यातील काही जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या कमी होऊन फक्त सात ते आठ जिल्हेच रेड झोनमध्ये राहतील. पण असं असलं तरीही अद्याप ऑक्सिजनची मागणी कमी झालेली नाही. त्यामुळे लॉकडाऊन वाढवावा की वाढवू नये याबाबत चर्चा होईल पण माझी तरी अशी भूमिका आहे की, तात्काळ पूर्णत: लॉकडाऊन उठवून धोका पत्करला जाऊ शकत नाही.’

‘टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उठवला जावा असा आमचा मानस आहे. त्यासाठी नियमांमध्ये हळूहळू शिथिलता आणली जावी अशा स्वरुपाचा सरकार विचार करत आहेत. तसेच त्या दृष्टीने या सरकार विचार करत आहे.’ अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.

दरम्यान, यावेळी वडेट्टीवार यांनी मुंबई लोकलबाबत देखील महत्त्वाचं विधान केलं आहे. ‘लोकल सुरु केल्याने कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे तूर्तास तरी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु ठेवण्याचा सरकारचा विचार आहे. कारण लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते ज्यामुळे पुन्हा परिस्थिती गंभीर होऊ शकते.’ असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp