Nagpur : भयंकर! अल्पवयीन मुलीने youtube बघून केली स्वतःची प्रसुती अन्…
Minor Girl delivers baby after watching youtube Videos: नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीने मुलीने ती गर्भवती असल्याची माहिती लपवून ठेवली आणि युट्यूबवर व्हिडीओ बघून स्वतःची प्रसुती केली. बाळाला जन्म दिल्यानंतर मुलीने लगेच त्या बाळाची गळा दाबून हत्या केली. नागपूरमधील अंबाझरी भागात घडलेल्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी मध्यरात्री नागपुरातील अंबाझरी पोलीस […]
ADVERTISEMENT
Minor Girl delivers baby after watching youtube Videos: नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीने मुलीने ती गर्भवती असल्याची माहिती लपवून ठेवली आणि युट्यूबवर व्हिडीओ बघून स्वतःची प्रसुती केली. बाळाला जन्म दिल्यानंतर मुलीने लगेच त्या बाळाची गळा दाबून हत्या केली. नागपूरमधील अंबाझरी भागात घडलेल्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
शुक्रवारी मध्यरात्री नागपुरातील अंबाझरी पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली. अल्पवयीन मुलीची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहेत.
व्हिडीओ बघून केली स्वतःची प्रसुती… घडलं काय?
नागपुरातील अंबाझरी परिसरात राहणारी पंधरा वर्षीय मुलगी नवव्या वर्गात शिकते. तिची आई कामानिमित्त दिवसभर घराबाहेर असते. वर्षभरापूर्वी इन्स्टाग्रामवर युवतीची ठाकूर नावाच्या युवकासोबत ओळख झाली.
हे वाचलं का?
Crime News : अल्पवयीन मुलासोबत शारीरीक संबंध…व्हिडिओही बनला…महिला सापडली अडचणीत
नंतर दोघेही चॅटिंग करायला लागले आणि जवळ येत गेले. पुढे त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केले. नंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. पीडित मुलीने ही गोष्ट तिच्या आईपासून दडवून ठेवली.
गर्भवती असताना युवतीने युट्यूब बघून प्रसूतीसाठी लागणारे साहित्य जमवले आणि शुक्रवारी तिच्या पोटात दुखू लागल्याने तिने युट्युबवर बघितलेल्या साहित्याच्या मदतीने स्वतःची प्रसूती केली आणि बाळाला जन्म दिला.
ADVERTISEMENT
बाळाला जन्म दिल्यानंतर युवती घाबरली. बाळ रडल्यास शेजाऱ्यांना आवाज जाईल व आपले बिंग फुटेल या भीतीने तिच्या मनात घर केले आणि तिने जवळच असलेल्या पट्ट्याने गळा आवळून बाळाला ठार केले. बाळाचा मृतदेह एका ट्रेमध्ये सज्जावर ठेवला.
ADVERTISEMENT
घरात रक्ताचे डाग आणि मुलीची प्रकृती खालावली
रात्री नऊ वाजताच्या सुमारास तिची आई घरी परतली असता, धक्काच बसला. आईला मुलीची प्रकृती खालावलेली दिसली आणि घरात काही ठिकाणी रक्ताचे डागही दिसले. त्यानंतर आईने मुलीला विचारणा केली असता, घडलेला प्रकार तिने आईला सांगितला. आईने तिला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
Crime : माहेरी आलेल्या प्रेयसीला घरी बोलावलं अन्… प्रियकराच्या कृतीने सातारा हादरलं
रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी अंबाझरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. अंबाझरी पोलिसांनी बाळाच्या मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू केला.
अल्पवयीन युवती रुग्णालयात उपचार घेत आहे. तिचा सविस्तर जबाब नोंदवून घेतल्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणाची माहिती समोर येणार आहे. तिने किती वेळ युट्युबवर प्रसूती कशी करतात, हे बघितले. ज्या युवकाने तिच्यावर वारंवार बलात्कार केला, तो कोण आहे? याची माहिती जबाबातून समोर येईल, अशी माहिती अंबाझरी पोलिसांनी मुंबई Tak सोबत बोलतांना सांगितलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT