लाइव्ह

MLA Disqualification Case : “तसं करून आपण अपात्रतेची कारवाई ओढवून घेतली आहे”

योगेश पांडे

ADVERTISEMENT

shiv sena mlas disqualification case live : uday samant, leader of shinde faction cross examination by thackeray faction lawyer devadatt kamat.
shiv sena mlas disqualification case live : uday samant, leader of shinde faction cross examination by thackeray faction lawyer devadatt kamat.
social share
google news

लाइव्हब्लॉग बंद

  • 05:20 PM • 11 Dec 2023

    माहिती दिशाभूल करणारी... सामंतांना ठाकरेंच्या वकिलांनी काय विचारलं?

    देवदत्त कामत - आपण आपल्या शपथपत्रात Para 1 ते 29 मध्ये जी माहिती उत्तर रुपात दिली आहे ती चूक आणि मिस गाईड करणारी आहे हे असे दिसून येत आहे हे बरोबर आहे का?उदय सामंत - हे चूक आहे.
  • 05:13 PM • 11 Dec 2023

    एकनाथ शिंदे २००४ पासून नेते होते असे कसे काय म्हणू शकता?

    देवदत्त कामत - प्रश्न क्रमांक 66 च्या उत्तरात आपण म्हटलं आहे की आपल्याला 2012 पूर्वी शिवसेनेतील नेतेपदाची काय परिस्थिती होती याची कल्पना नाही, तर प्रश्न क्रमांक 59 च्या उत्तरात आपण एकनाथ शिंदे हे 2004 पासून शिवसेनेचे नेते होते असं आपण कसं काय म्हणू शकता?उदय सामंत - विधानसभेचा सदस्य झाल्यानंतर विधानसभेतील सहकाऱ्यांबरोबर चर्चा करताना ही माहिती मला मिळाली.देवदत्त कामत - वरील प्रश्नाच्या उत्तरात म्हटल्याप्रमाणे आपल्यालाही माहिती आपल्या इतर सहकाऱ्यांबरोबर बोलताना मिळाली, असे आपण म्हणता. तर ही माहिती इतर सहकाऱ्यांशी बोलताना मिळाली आहे की ऑफिशियल डॉक्युमेंटवर आधारित आहे? चूक की बरोबर?उदय सामंत - होय. त्यावेळी असू शकेल कारण मी एनसीपी मध्ये होतो.
  • 05:08 PM • 11 Dec 2023

    पक्षप्रमुख हा शब्द कुठून घेतला? ठाकरेंच्या वकिलांचा शिंदेंच्या आमदाराला सवाल

    देवदत्त कामत - आपल्या प्रश्न क्रमांक 56 मधील उत्तर मध्ये म्हटल्यानुसार आम्ही उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून संबोधत होतो. आपण पक्षप्रमुख हा शब्द कुठून घेतला?उदय सामंत - काही नेते मंडळींची तशी इच्छा होती आणि आदरापोटी सर्वांनी ते उचलून धरले.देवदत्त कामत - उद्धव ठाकरे हे शिवसेना राजकीय पक्षाचे अध्यक्ष म्हणून सर्व संमतीने निवडून आले होते, तेही बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर सन 2012 मध्ये. हे चूक की बरोबर?उदय सामंत - याबद्दल मला माहिती नाही. मी 2012 मध्ये शिवसेनेत नव्हतो.देवदत्त कामत - आपल्यासमोर मुख्य निवडणूक आयोगांना दिलेले पत्र आहे. त्या पत्राच्या दुसऱ्या परिच्छेदात असे म्हटले आहे की, शिवसेना पक्षप्रमुख या पदासाठी केवळ एकच फॉर्म प्राप्त झाला होता आणि परिच्छेद तीन मध्ये असं म्हटलं आहे की, सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. कारण जेवढी पदांची संख्या होती तेवढेच फॉर्म प्राप्त झाले होते. मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला असे म्हणायचे आहे का की, उद्धव ठाकरे हे शिवसेना या राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदी सन 2013 साली प्रथम एक मताने निवडून आले होते. आपल्याला याबद्दल काय म्हणायचे आहे?उदय सामंत - त्याबाबत मला काही माहिती नाही.
  • 04:34 PM • 11 Dec 2023

    कोणत्या काळात शिवसेनेचे आमदार-खासदार शिंदेंकडे गाऱ्हाणे मांडायचे? कामतांचा सवाल

    देवदत्त कामत - वरील प्रश्नाच्या उत्तरात आपण म्हटलं की पक्षाचे लोकप्रतिनिधी शिंदे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडत होते, अस म्हणता, तर आपण कुठल्या काळाचा संदर्भ देत आहात?उदय सामंत - काळ मोठा होता, पण स्पेसिफिक मला आता आठवत नाही. मला आठवत नाही.
  • ADVERTISEMENT

  • 04:30 PM • 11 Dec 2023

    हे चुकीचे आहे, कामतांच्या प्रश्नावर सामंतांचा खुलासा

    देवदत्त कामत - Majority of organization, who are also public representative have unanimously extended support to shinde is absolutely false and baseless, is it correct? (संघटनेतील बहुसंख्य, जे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी एकमताने शिंदे यांना दिलेला पाठिंबा हा खोटा आणि निराधार आहे, हे बरोबर आहे का?)उदय सामंत - हे चुकीचे आहे. या प्रश्नाचे अनुषंगाने मला एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती सांगितली पाहिजे की, 1999 च्या अमेंडमेंटमध्ये पक्षप्रमुख हे पद नसताना देखील वंदनीय बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून आणि आम्हाला सर्वांना आधार होता म्हणून पक्षाप्रमुख असा उल्लेख आमच्याकडून होत होता. तरी देखील आमदारांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क नसल्यामुळे लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी आपल्या सर्व अडीअडचणी गेली कित्येक वर्ष शिवसेनेचे नेते म्हणून काम करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडायचे आणि त्यांना शिवसेना नेते म्हणून शिंदे सर्वांना न्याय द्यायचे.
  • 04:29 PM • 11 Dec 2023

    आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती केली होती -उदय सामंत

    देवदत्त कामत - तुम्ही किंवा अन्य आमदारांनी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीसोबत गठबंधन तोडण्यासाठी विनंती केलेली नव्हती, हे चूक की बरोबर?उदय सामंत - ते चुकीचे आहे, आम्ही विनंती केलेली होती.
  • ADVERTISEMENT

  • 04:18 PM • 11 Dec 2023

    आपण अपात्रतेेची कारवाई ओढवून घेतली आहे -देवदत्त कामत

    देवदत्त कामत - मी आपल्याला असे म्हणू शकतो का की, 2 जुलै 2022 रोजी विश्वासदर्शक प्रस्तावा दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान करून सुनील प्रभू यांच्याद्वारे पाठवलेल्या पक्षादेशाचं आपण उल्लंघन केलं आहे आणि आपण अपात्रतेची कारवाई आपल्यावर ओढवून घेतली आहे.उदय सामंत - खोटे आहे. चुकीचे आहे.
  • 04:17 PM • 11 Dec 2023

    होय, मी एकनाथ शिंदे सरकारच्या बाजून मतदान केले -उदय सामंत

    देवदत्त कामत - आपल्याला सुनील प्रभू यांचा दिनांक 2 जुलै 2022 रोजी जारी केलेला पक्षादेश मिळाला होता म्हणून आपण हे चुकीचे साक्ष देत आहात, असं मला म्हणायचं आहे. हे चूक की बरोबर?उदय सामंत - चूक.देवदत्त कामत - 4 जुलै 2022 रोजीच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी तुम्ही एकनाथ शिंदे सरकारच्या बाजूने मतदान केले होते काय?उदय सामंत -होय.
  • 04:15 PM • 11 Dec 2023

    मी राहुल नार्वेकरांना मतदान केले -उदय सामंत

    देवदत्त - 3 जुलै 2022 च्या विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक झाली होती. त्यात आपण भारतीय जनता पक्षाचे राहुल नार्वेकर यांना मतदान केले होते का?उदय सामंत - अध्यक्षपदाची जी निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये माझ्या सद्सद् विवेकबुद्धीप्रमाणे मी राहुल नार्वेकर यांना मतदान केले होते, कारण महाराष्ट्र विधानसभेचे कामकाज ते योग्य तऱ्हेने चालवतील अशी खात्री होती.देवदत्त कामत - तीन जुलै 2022 रोजी च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना या राजकीय पक्षाकडून पक्षादेश जारी करण्यात आला होता, असं आपल्याला म्हणायचं आहे का?उदय सामंत - मी मागील उत्तरांमध्ये देखील असे सांगितले आहे की, मला जी माहिती आहे. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी व्हीपची आवश्यकता नाही. म्हणून मी माझी सद्सद् बुद्धी जागृत ठेवून योग्य त्या व्यक्तीस मतदान केले आणि त्यावेळी देखील व्हीप मिळालेला नव्हता.देवदत्त कामत - विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना विधिमंडळ पक्षाने कोणताही पक्षादेश जारी केला नाही असे आपल्याला म्हणायचे आहे का ?उदय सामंत - मला मिळालेला नाही, बाकी मला माहिती नाही.
  • 04:14 PM • 11 Dec 2023

    व्हीपवरून उदय सामंतांना सवाल

    देवदत्त कामत - mlaoffice99@gmail.com हा आपला ईमेल ऍड्रेस आहे, हे बरोबर आहे का?उदय सामंत - हो, बरोबर आहे.देवदत्त कामत - 2 जुलै 2022 रोजी सुनील प्रभू यांनी जारी केलेले दोन पक्षादेश तुम्हाला ईमेलच्या माध्यमातून वरील ईमेल आयडीवर विजय जोशी यांच्याकडून प्राप्त झाले होते, हे खरे आहे का?उदय सामंत - हे चुकीचे आहे. माझ्या ईमेल आयडीवर मला कुठलाही व्हीप मिळालेला नाही.देवदत्त कामत - राजन साळवी हे सन 2019 च्या महाराष्ट्र विधानसभेत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते, याची आपल्याला कल्पना आहे का?उदय सामंत - होय.
  • 04:02 PM • 11 Dec 2023

    मी बैठकीला उपस्थित नव्हतो -उदय सामंत

    देवदत्त कामत - हे खरे आहे काय की, 22 जुलै 2022 रोजीच्या बैठकीत आपण उशिरा पोहोचल्यानंतर आपल्या कर्मचाऱ्यानी त्याची फोटोकॉपी काढली?उदय सामंत - हे चुकीचे आहे. दिनांक 22 जून 2022 रोजीच्या बैठकीस मी उपस्थित नव्हतो.
  • 03:51 PM • 11 Dec 2023

    उदय सामंत म्हणाले, मी सहमत नाही

    देवदत्त कामत - मी आपल्याला असे म्हणू शकतो की, आपण 21 जून 2022 रोजीच्या बैठकीच्या उपस्थिती पत्रावर जी स्वाक्षरी आहे, ती आपली नाही असे म्हटलेले आहे. खरंतर आपल्याला हे नंतर सुचलेले आहे, त्यामुळे ही आपली चूक नाही का?उदय सामंत- मी सहमत नाही.
  • 03:49 PM • 11 Dec 2023

    सहीचा मुद्दा ठाकरेंच्या वकिलांनी सामंतांना पकडलं खिंडीत

    देवदत्त कामत - आपण म्हटल्याप्रमाणे याचिकेला आपलं उत्तर मसुदा तयार होत असताना आपल्या वकिलाने आता आपण जे डॉक्युमेंट बघितलं त्याची आपल्याला कल्पना दिली होती. मग असं असूनही आपल्या संपूर्ण उत्तरांमध्ये या पी 2 वर स्वाक्षरी आपली नसल्याचा इन्कार कुठे केला नाही, असं का?उदय सामंत - याचे उत्तर मी अगोदरच दिलेले आहे. कारण सहीच्या बाबतीतील कागदांवर मी सही केलेली नाही, या बाबीवर मी ठाम आहे.
  • 03:47 PM • 11 Dec 2023

    एकनाथ शिंदेंना हटवण्यासाठी माझ्या नावाचा वापर केला गेला -उदय सामंत

    देवदत्त कामत - आपण पूर्वी कोणत्या दिवशी हा कागद बघितला आहे का?उदय सामंत - नाही.देवदत्त कामत - अपात्रता याचिकेला ऑगस्ट 2023 मध्ये उत्तर देताना 24 नोव्हेंबर 2023 रोजी हे शपथपत्र सादर केले आहे. आपल्याला या डॉक्युमेंटची कल्पना नव्हती असं म्हणायचं आहे का?उदय सामंत - हे डॉक्युमेंट जरी आता पाहिले असले, तरी माझ्या वकिलांनी रिप्लाय करताना मला ब्रीफ केले होते. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 21 तारखेच्या बैठकीनंतर ज्यावेळी मी माझ्या शासकीय निवासस्थानी आलो. त्यावेळी मी देखील सोशल मीडियावर आणि टीव्हीवर असं पाहिलं की, मी कोणत्याही कागदपत्रावर किंवा व्हीप वर सही न करता देखील त्यावेळी माझ्या नावाचा उपयोग करून एकनाथ शिंदे यांना हटवण्याची कारवाई करण्यात आली होती.
  • 03:44 PM • 11 Dec 2023

    ठाकरेंच्या वकिलांचा सहीवरून उलट सवाल

    देवदत्त कामत - मागील प्रश्न क्रमांक 36 ला आपण जे उत्तर दिले. त्यानुसार आपण सहपत्र P-2 अपात्रता पीटिशन क्रमांक 19/2022 ही आजच्या आधी कधी पाहिलेली नव्हती, असा याचा अर्थ घायचा का ?उदय सामंत - मी मागील उत्तरामध्ये असे म्हणालो आहे की, माझ्या हातामध्ये जे सह्याचे कागद देण्यात आले, त्यावरील सही माझी नाही.
  • 03:42 PM • 11 Dec 2023

    ती स्वाक्षरी माझी नाही - उदय सामंत

    देवदत्त कामत - पेज 9 वर ज्या 24 स्वाक्षऱ्या आहे त्यापैकी एक आपली आहे का ?उदय सामंत - नाहीदेवदत्त कामत - या डॉक्युमेंटमध्ये एकूण 24 स्वाक्षऱ्या आहेत, हे खरे आहे काय?उदय सामंत - आता जो कागद माझ्या हातात दिलेला आहे, त्यावरील सह्या मोजल्या असता त्या 24 आहेत, परंतु त्यामध्ये माझी सही नाही.
  • 10:57 AM • 11 Dec 2023

    व्हीपवरून ठाकरेंच्या वकिलाचा उलट सवाल

    देवदत्त कामत - शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाचे पक्षादेश 21 जून 2022 रोजीचा प्राप्त झाल्यांनातर तुम्ही व्हीप मिळाल्याची पोच पावती दिली होती का?उदय सामंत - मी सुरुवातीला सांगितले की आहे की, ही सही माझी नाही. हा व्हीप मी स्वीकारलेला नव्हता, परंतु माझ्या मर्यादित माहितीनुसार सभागृहातील कामकाजासाठी किंवा मतदानासाठी व्हीप असतो. आता माझ्या हातात जो कागद ठेवलेला आहे, त्यावरून मला असे वाटत आहे की, हा व्हीप नसून ते पत्र आहे. त्यावर असलेली सही माझी नाही. त्यामुळे तो स्वीकारायचा प्रश्न नाही. असा कागद निमंत्रण किंवा पत्र खासगी कार्यक्रमाचे देखील निघू शकते.
  • 10:53 AM • 11 Dec 2023

    मला कोणताच व्हीप मिळाला नाही - उदय सामंत

    देवदत्त कामत - 21 जून 2022 रोजी वर्षा बंगल्यावरील बैठकीत उपस्थित होतात. 21 जून 2022 रोजीच्या सुनील प्रभू यांचा पक्ष आदेश आपल्याला प्राप्त झाला होता म्हणून आपण उपस्थित होते का?उदय सामंत - 21 जून रोजी माझे विधिमंडळातील सहकारी गुलाबराव पाटील यांनी वर्षा बंगल्यावर बैठक असल्याचे मला सांगितले आणि मला निमंत्रण दिले. परंतु ही बैठक कशा संदर्भात आहे हे मला सांगितले नव्हते. मी या बैठकीला उपस्थित होतो परंतु त्या दिवशी किंवा त्यानंतर कोणताही व्हीप मला देण्यात आलेला नाही. मी तो स्वीकारलेला नाही आणि कोणतीही सही कोणत्याही कागदावर केलेली नाही. सुनील प्रभू यांच्या द्वारा कोणताही व्हीप मला देण्यात आलेला नाही.
  • 10:48 AM • 11 Dec 2023

    एकनाथ शिंदेंना खासदार-आमदारांचा पाठिंबा होता -उदय सामंत

    देवदत्त कामत - पक्षाच्या बहुतांश पक्ष संघटनेने ज्यामध्ये जनप्रतिनिधी सुद्धा आहेत, त्यांनी एकनाथ शिंदे यांना एकमताने पाठिंबा दर्शवला होता का? निवडून आलेले लोकप्रतिनिधी, असे आपल्याला म्हणायचं आहे का?उदय सामंत - निवडून आलेले लोकप्रतिनिधी त्यामध्ये आमदार असतील, खासदार असतील, विधान परिषदेचे सदस्य असतील आणि पक्ष संघटनेचे पदाधिकारी असतील.
  • 10:44 AM • 11 Dec 2023

    एकनाथ शिंदेंही उद्धव ठाकरेंना बोलले पण उपयोग झाला नाही -उदय सामंत

    देवदत्त कामत - वरच्या प्रश्न क्रमांक 24 मध्ये म्हटल्यानुसार आपण उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत युती करण्याबाबत भेटणार असं म्हटलं होतं. ही विनंती आपण एकनाथ शिंदे यांना गटनेता म्हणून का नाही केली?उदय सामंत - मी आणि माझ्या आमदार सहकाऱ्यांनी गटनेते म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना ही विनंती केली होती आणि आमच्या मागणीनुसार गटनेते एकनाथ शिंदे यांनी देखील अनेक वेळा उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हे सांगितले होते, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.
follow whatsapp

ADVERTISEMENT