Amravati MLC Election : रणजीत पाटलांचा ‘2’ आकड्याने केला घात; वाचा इनसाईड स्टोरी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Mlc election update :

ADVERTISEMENT

अमरावती : कोकण शिक्षक मतदारसंघ वगळता विधान परिषद निवडणुकीत अन्य ३ जागांवर भाजपच्या पदरी निराशा पडली आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजप पुरस्कृत उमेदवार नागो गाणार यांचा मोठा पराभव झाला. तर औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातही किरण पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील (Ranjeet Patil) पराभवाच्या छायेत आहेत. (Mlc election update congress dheeraj lingade defat bjp candidate ranjeet patil)

या तिन्ही ठिकाणच्या भाजपच्या पराभवाची अनेक कारण आहेत. यात संघटनात्मक बांधणी, उमेदवाराविषयीची नाराजी अशी वेगवेगळी कारण सांगता येतील. पण सर्वात वेगळं कारण अमरावती पदवीधर मतदारसंघामध्ये आहे. कारण इथे भाजपच्या सर्व गोष्टी त्यांनी केलेल्या नियोजनानुसारच घडल्या, पण केवळं ‘2’ या आकड्यानेच डॉ. रणजीत पाटील यांचा घात केल्याची चर्चा आहे.

हे वाचलं का?

MLC Election : तांबेंच्या विजयोत्सवात थोरातांची गाडी; ‘576’ दिला खास मेसेज

अमरावतीमध्ये नेमकं काय घडलं?

अमरावतीमध्ये अत्यंत काट्याची टक्कर झाली. मतमोजणीच्या पहिल्या तासापासूनच पारडं कधी रणजीत पाटील यांच्याबाजूने तर कधी धीरज लिंगाडे यांच्याबाजूने झुकतं होतं. दुसरी फेरी सुरु असताना डॉ. रणजीत पाटील यांना 41 हजार 260 मतं मिळाली होती, तर धीरज लिंगाडे यांना 43 हजार 632 मतं पडली होती. पण यात बाद मतांची संख्या लक्षणीय ठरली. अमरावतीमध्ये तब्बल 8 हजार 735 बाद ठरली.

ADVERTISEMENT

मतमोजणी प्रक्रियेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सुत्रांना दिलेल्या माहितीनुसार याच बाद ठरलेल्या 8 हजार 735 मतांमध्ये जवळपास साडेपाच हजार मतं ही रणजीत पाटील यांची आहेत. या मतपत्रिकांवर केवळ ‘2’ हा आकडा लिहिला आहे. या मतपत्रिकांवर ‘1’ असा पसंतीक्रमच कोणाच्याही नावापुढे नव्हता. त्यामुळे या मतपत्रिका बाद ठरविण्यात आल्या.

ADVERTISEMENT

नव मतदारांनी बिघडवलं गणित?

अमरावतीमध्ये यंदा जवळपास 6 हजार नवीन मतदारांची नोंदणी झाली होती. याच मतदारांनी रणजीत पाटील यांचं विजयाचं गणित बिघडवल्याची चर्चा आहे. मतपत्रिकेमध्ये रणजीत पाटील यांचं नाव दुसऱ्या क्रमांकावर होतं. नियमानुसार या नावापुढे केवळ ‘1’ हा आकडा लिहिणं अपेक्षित होतं. मात्र रणजीत पाटील यांचं नाव दुसऱ्या क्रमांकावर असल्याने त्यांच्या नावापुढे ‘2’ असा आकडा लिहिल्यास ते भरघोस मतांनी निवडून येऊ शकतात, अशी अफवा मोठ्या प्रमाणावर पसरविण्यात आली होती.

MLC Election : नागो गाणार पराभूत : भाजपनं अंग काढलं? बावनकुळे म्हणाले…

त्यातूनच पाटील यांच्या नावापुढे ‘1’ असा पसंतीक्रम न लिहिता थेट ‘2’ हा आकडा लिहिला गेला. त्यामुळे 8 हजार 735 मतपत्रिका बाद ठरल्या, असं सांगितलं जात आहे. दरम्यान, या 8 हजार 735 बाद मतांच्या फेर तपासणीसाठी रणजीत पाटील यांनी अर्ज केला होता. त्यांचा हा अर्ज मान्य करत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दहा टेबलवर फेर मतमोजणी सुरूही केली. यापैकी धीरज लिंगाडे यांना 177 मत मिळाली. तर रणजीत पाटील यांना 145 मत मिळाली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT