ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित : राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : महाराष्ट्रासह अनेक राज्यांतून पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित लोकांना एनआयए आणि ईडीकडून अटक करण्यात आली. यानंतर पुण्यात शनिवारी पाकिस्तान जिंदाबादची नारे देण्यात आल्याचा प्रकार घडल्याचा समोर आले. घोषणाबाजी करतानाचे काही व्हिडीओ समोर आले असून, या व्हिडीओच्या आधारे आंदोलकांकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. यावर, पुणे पोलिसांकडून अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.

ADVERTISEMENT

ही घटना आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाष्य केले असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला. याशिवाय यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली.

माझी केंद्रातील, राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर, आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे, असे ट्विट करत एक पत्र राज ठाकरे यांनी शेअर केले आहे.

हे वाचलं का?

काय म्हटले आहे पत्रात?

एनआयएने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली, म्हणून पुण्यात ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्या. सरकारने ह्यांना वेळीच ठेचलं पाहिजे.

ही अटक कशासाठी झाली? तर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरं आयोजित करणे, ह्या गंभीर आरोपांखाली. थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी. तरीही ह्या देशद्रोह्यांचं समर्थन करत जर ह्या PFI च्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल, तर तुमचा धर्म घ्या, आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेरं आमच्या देशांत चालणार नाहीत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

माझी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की फक्त ह्या देशद्रोह्यांनाच नव्हे तर त्यांच्या ह्या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा की, यापुढे पाण्यासाठी देखील (पा) उच्चारता येणार नाही, नाहीतर आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत.

हिंदुस्थानातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहट्ट्यांच्या मुठी जर आवळल्या तर ह्या हरामखोरांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका. ह्या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल.

त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत म्हटलं की, ‘पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करेलच, पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत’, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT