PM Modi’s image: Covid Vaccine Certificate वर मोदींचा फोटो का? सरकारने दिले ‘हे’ उत्तर

मुंबई तक

नवी दिल्ली: कोरोना लस (Corona Vaccine) घेतल्यानंतर मिळालेल्या लस प्रमाणपत्रावर (Vaccine Certificate) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांचा जो फोटो लावण्यात आला आहे त्यावर विरोधकांच्या वतीने सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परंतु आता राज्यसभेत (Rajya Sabha) आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) प्रमाणपत्रावर पीएम मोदींचा फोटो का लावण्यात आला आहे याचे नेमके कारण दिले आहे. आरोग्य […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नवी दिल्ली: कोरोना लस (Corona Vaccine) घेतल्यानंतर मिळालेल्या लस प्रमाणपत्रावर (Vaccine Certificate) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांचा जो फोटो लावण्यात आला आहे त्यावर विरोधकांच्या वतीने सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परंतु आता राज्यसभेत (Rajya Sabha) आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) प्रमाणपत्रावर पीएम मोदींचा फोटो का लावण्यात आला आहे याचे नेमके कारण दिले आहे.

आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी राज्यसभेत सांगितले की, कोव्हिड-19 (Covid-19) चे योग्य वर्तनाचे (appropriate behavior) पालन करणे हा या रोगाचा प्रसार रोखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. तसेच लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींच्या संदेशासह फोटो असल्याने लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यास अधिक मदत करते.

लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींच्या फोटोसह नेमका काय संदेश आहे?

ज्यांचे लसीकरण झाले आहे त्यांना त्याचे प्रमाणपत्र दिले जात आहे. याच प्रमाणपत्रावर क्यूआर कोडसह पंतप्रधान मोदींचा फोटो देखील झापण्यात आला आहे. यामध्ये त्यांच्या फोटोच्या समोर त्यांच्या भाषणातील एक वाक्य देखील झापण्यात आलं आहे. ‘औषध सुद्धा आणि शिस्त सुद्धा… एकत्रितपणे भारत कोविड -19 ला हरवेल.’

हे वाचलं का?

    follow whatsapp