Mood of the Nation: भारत जोडो यात्रा मोदींच्या सत्तेला सुरुंग लावेल का?

मुंबई तक

Mood of the Nation Survey Bharat Jodo Yatra and Rahul Gandhi: मुंबई: देशात एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपचा (BJP) बोलबाला असताना दुसरीकडे त्यांच्या या वर्चस्वाला आणि देशातील सत्तेला सुरुंग लावण्यासाठी काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी (Rahul Modi) हे पुन्हा एकदा सज्ज झाले. ‘भारत जोडो यात्रेच्या’ निमित्ताने त्यांनी पुन्हा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Mood of the Nation Survey Bharat Jodo Yatra and Rahul Gandhi: मुंबई: देशात एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपचा (BJP) बोलबाला असताना दुसरीकडे त्यांच्या या वर्चस्वाला आणि देशातील सत्तेला सुरुंग लावण्यासाठी काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी (Rahul Modi) हे पुन्हा एकदा सज्ज झाले. ‘भारत जोडो यात्रेच्या’ निमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा रणशिंग फुकंलं आहे. आता याच भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीत किती फायदा होणार याबाबत India Today-C Voter ने एक सर्व्हे केला असून यात जनतेचा नेमका कौल काय आहे हे सविस्तर जाणून घ्या. (mood of the nation india today c voter will bharat jodo yatra undermine bjps power)

आताच्या सर्व्हेनुसार, भारत जोडो यात्रेला सहा महिने होऊन सुद्धा काँग्रेसच्या मतांमध्ये फारसा फरक झालेला दिसत नाही. काँग्रेसने फारशी उडी मारलेली दिसत नाही. आपण असं मानूयात की, निवडणुकीसाठी राहुल गांधींनी ही यात्रा केलेली नव्हती. पण तरीही त्याचा एक इम्पॅक्ट दिसायला हवा होता. विशेषत: उत्तर भारतात. तो झालेला दिसत नाही.

याबाबत C-Voter चे संस्थापक यशवंत देशमुख यांनी सविस्तर विश्लेषण केलं आहे.

यशवंत देमशमुख म्हणाले की, ‘याचं प्रमुख कारण म्हणजे राहुल गांधींनी केरळमध्ये जेवढे दिवस या यात्रेसाठी दिले तेवढे दिवस उत्तर भारतात अजिबात दिले नाहीत. असं आहे की, लोकांना भारत जोडो यात्रेबाबत म्हटलं की, छान यात्र आहे, चांगला प्रयत्न आहे. काहीही नसण्यापेक्षा काही तरी होतंय हे महत्त्वाचं. प्रत्येक राज्यातून यात्रा गेली त्यानंतर राहुल गांधींच्या रेटिंगमध्ये वाढ झाली आहे.’

‘लोकांना असंही वाटतं की, आता राहुल गांधींनी जे केलं ते छान केलं. पण नंतर त्याचा फॉलोअप काय? त्याबाबतीत पुढे काही होणार की, हा फक्त एक इव्हेंट असणार. याबाबत लोकांना जोवर स्पष्टता येणार नाही तोवर रेटिंग फार वाढणार नाही.’

हे वाचलं का?

    follow whatsapp