Mood Of The Nation : NDA सरकारचं सर्वात मोठं अपयश कोणतं? काय म्हणतो आहे इंडिया टुडेचा सर्व्हे?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार दुसऱ्यांदा येऊन आता दोन वर्षे झाली आहेत. आणखी तीन वर्षांनी लोकसभा निवडणूक असणार आहे. ऑगस्ट 2020 जानेवारी 2021 आणि ऑगस्ट 2021 अशा तीन वेळा हा सर्व्हे कऱण्यात आला आहे. ऑगस्ट 2020 आणि ऑगस्ट 2021 हे दोन्ही महिने महत्त्वाचे आहेत. कारण कोरोनाची पहिली लाट आणि दुसरी लाट ओसरतानाचे हे दोन महिने आहेत. लोकांनी काय उत्तरं दिली आहेत? ती फार महत्त्वाची आहेत.

ADVERTISEMENT

मोदींच्या पहिल्या टर्ममध्ये नोटबंदी, जीएसटी, सर्जिकल स्ट्राईक यांसारखे महत्त्वाचे निर्णय होते. मात्र मोदींच्या दुसऱ्या टर्ममध्ये कोरोनाचं संकट देशावर आलं. पहिली लाट गेल्यानंतर कोरोना संपला असं जाहीरच करण्यात आलं. मात्र फेब्रुवारीत दुसरी लाट आली आणि दुसऱ्या लाटेत काय कहर माजला गेला हे आपण पाहिलंच आहे. बंगाल विधानसभेची निवडणूक झाली आणि ती लढाई ममता बॅनर्जी विरूद्ध भाजप अशी होती. जी ममता बॅनर्जींनी जिंकली. त्यानंतर सगळी गणितं बदलल्याचं दिसतं आहे. इंडिया टुडेचा सर्व्हेही हेच सांगतो आहे. आपण पाहुयात काय आहे एनडीएचं सर्वात मोठं अपयश काय आणि यश काय?

हे वाचलं का?

NDA सरकारचं सगळ्यात मोठं अपयश कोणतं? काय म्हणत आहेत लोक?

महागाई आणि मंदी या मुद्द्यांवर सर्वात जास्त लोकांनी नापसंती दर्शवली आहे. देशातली महागाई आणि मंदी या दोन्ही गोष्टी रोखण्यात सरकारला अपयश आलं आहे असं लोकांना वाटतं आहे. ऑगस्ट 2021 मध्ये 29 टक्के लोकांना हे वाटतं आहे की महागाई आणि मंदी हे दोन मुद्दे हाताळण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. हेच प्रमाण जानेवारी महिन्यात 13 टक्के होतं तर मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात हे प्रमाण 11 टक्के होते. मंदीचं सावट देशावर होतंच. अशात कोरोना आला त्यामुळे महागाई वाढली आणि मंदीही.

ADVERTISEMENT

बेरोजगारी हा जो मुद्दा आहे त्याबाबत ऑगस्ट 2021 महिन्यात 23 टक्के लोकांनी याबाबत ऑगस्ट 2021 नाराजी व्यक्त केली. जानेवारी महिन्यात हे प्रमाण 29 टक्के होतं तर ऑगस्ट 2020 महिन्यात हे प्रमाण 23 टक्के होतं.

ADVERTISEMENT

कोरोना हाताळणीच्या परिस्थितीत सरकार किती अपयशी ठरलं आहे? याबाबतही लोकांनी सरकार किती टक्के अपयशी ठरलं आहे ते सांगितलं आहे. ऑगस्ट 2021 महिन्यात हे प्रमाण 11 टक्के, जानेवारी 2021 मध्ये हे प्रमाण 8 टक्के होतं तर मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात हे प्रमाण 25 टक्के होतं. कोरोना परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरलं आहे हेच ही टक्केवारी सांगते आहे.

शेतकरी आंदोलनाचा प्रश्न मोदी सरकारने अद्यापही भिजत ठेवला आहे. त्यामुळे त्याबाबतही लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ऑगस्ट 2021 या महिन्यात 8 टक्के लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जानेवारी 2021 महिन्यात हे प्रमाण 9 टक्के होतं. तर ऑगस्ट 2020 महिन्यात हे प्रमाण 6 टक्के इतकं होतं. शेतकरी आंदोलनाचा प्रश्न चिघळला आहे. 26 जानेवारीला झालेलं आंदोलन हे शेतकऱ्यांचा आक्रोश दाखवणारंच होतं. त्यामुळे याबाबतही लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दुसरीकडे नोटबंदीबाबतही लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ऑगस्ट महिन्यात 7 टक्के लोकांनी नोटबंदीच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तर ऑगस्ट २०२० या महिन्यात हे प्रमाण 10 टक्के होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT