महाराष्ट्रात दिवसभरात 57 हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह, दिवसभरात 920 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात दिवसभरात 57 हजार 640 रूग्णांच्य नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 57 हजार 6 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 41 लाख 64 हजार 98 कोरोनाबाधित रूग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा आता 85.32 टक्के इतका झाला आहे. राज्यात दिवसभरात 920 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद जाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा 1.49 टक्के इतका झाला आहे.

ADVERTISEMENT

मुंबईत 3879 रूग्ण कोरोनाबाधित, पुण्यात 3260 नव्या रूग्णांची नोंद

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 83 लाख 84 हजार 582 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 48 लाख 80 हजार 542 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 38 लाख 52 हजार 501 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 32 हजार 174 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 6 लाख 41 हजार 596 सक्रिय रूग्ण आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

कुठल्या राज्यात लसींचा किती साठा, किती लसी गेल्या वाया?

महाराष्ट्रात दिवसभरात 57 हजार 640 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 48 लाख 80 हजार 542 इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या 920 मृत्यूंपैकी 414 मृत्यू हे मागील 48 तासांमधले आहेत. तर 219 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 287 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीपूर्वीचे आहेत. हे मृत्यू पुणे 79, नाशिक 62, ठाणे 53, नागपूर 18, जळगाव 12, नंदुरबार 12, नांदेड 5, परभणी 5, रायगड 5, औरंगाबाद 4, वर्धा 4, हिंगोली 3, लातूर 3, अहमदनगर 2, चंद्रपूर 2, अमरावती 1 भंडारा 1, जालना 1, उस्मानाबाद 1, सांगली 1 आणि वाशिम 1 असे आहेत. पोर्टलनुसार ही संख्या अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत या सगळ्या मृत्यूंची नोंद आज घेण्यात आल्याचंही महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी महाराष्ट्राचं Mission Oxygen-मुख्यमंत्री

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हे आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या

मुंबई- 56 हजार 153

ठाणे- 44 हजार 716

पालघर-18 हजार 360

रायगड- 11 हजार 623

पुणे- 1 लाख 42 हजार 254

सातारा-21 हजार २५

सांगली-16 हजार 801

कोल्हापूर-12 हजार 155

सोलापूर-20 हजार 630

नाशिक-46 हजार 541

अहमदनगर-21 हजार 43

औरंगाबाद-11 हजार 549

बीड-15 हजार 37

लातूर-12 हजार 38

परभणी-10 हजार 43

बुलढाणा-14 हजार 533

नागपूर- 58 हजार 944

चंद्रपूर- 28 हजार 105

राज्यभरातील प्रमुख जिल्ह्यांमधल्या अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या पाहिली तर पुण्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह केसेस आहेत. मुंबई, नागपूर, ठाणे या जिल्ह्यांमध्येही सक्रिय रूग्ण जास्त आहेत. मात्र गेल्या तीन आठवड्यांमध्ये या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णसंख्येत घट पाहण्यास मिळाली आहे असं केंद्र सरकारने सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT