अभिनेता संदिप नाहरची आत्महत्या, फेसबूकवर पोस्ट केली सुसाईड नोट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महेंद्रसिंह धोनी द अनटोल्ट स्टोरी, केसरी यासारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता संदीप नाहरने आत्महत्या केली आहे. संदीपने आपली सुसाईड नोट सोशल मीडियावर पोस्ट करुन कौटुंबिक समस्यांनी हैराण होऊन आपण हे पाऊल उचलत असल्याचं संदीपने म्हटलं आहे. गेल्याच वर्षात अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीला धक्का बसला होता. यानंतर त्याच चित्रपटातील एका अभिनेत्याने आत्महत्या केल्यामुळे खळबळ माजली आहे.

फेसबूकवर पोस्ट केलेल्या आपल्या सुसाईड नोटमध्ये संदीपने गेल्या काही दिवसांपासून आपण कौटुंबिक कारणांमुळे त्रस्त असल्याचं सांगितलं आहे. याचसोबत आपली पत्नी कांचन शर्मासोबत आपले संबंध ठीक नसल्याचंही संदीपने म्हटलंय. दरम्यान, मुंबई पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून तपासाला सुरुवात झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून संदिप मानसिक तणावात होता. सोशल मीडियावरही त्याने त्याची ही मानसिक स्थितीबद्दल उघडपणे मांडलं होतं. आत्महत्येपूर्वी काही दिवस आधी संदीपने त्याचे आणि त्याच्या पत्नीमधील वाद फेसबुक पेजवर व्हिडीओच्या माध्यमातून मांडले होते. ज्यामध्ये त्याने पत्नीच्या घरचे त्याला मानसिक त्रास देत होते आणि ब्लॅकमेल करत होते असं म्हटलंय. संदीपने त्याच्या मृत्यूच्या आधी काही दिवस हा व्हिडीओ शेअर केला होता. त्यामुळे याप्रकरणात मुंबई पोलीस आता पुढे काय पावलं उचलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बॉलिवूड फिल्मसोबत संदीपने अल्ट बालाजी, झी 5 वरील काही वेबसिरीजमध्येही काम केलं होतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT