महाराष्ट्रात Mucormycosis चं संकट गहिरं, आत्तापर्यंत 4 हजारांपेक्षा जास्त रूग्ण
महाराष्ट्रात Mucor mycosis चं संकट राज्यात गहिरं झालं आहे. समोर आलेली आकडेवारी हेच सांगते आहे. महाराष्ट्रात आज घडीला 4200 च्या जवळ जाऊन पोहचला आहे. तर आत्तापर्यंत राज्यात 120 जणांचा मृत्यू म्युकरमायकोसिस म्हणजेच काळ्या बुरशीमुळे झाला आहे. अशात काळ्या बुरशीवर म्हणजेच म्युकरमायकोसिसवर लागू पडणाऱं Anti Fungal Drug – Amphotericin B या औषधाचा तुटवडा भासतो आहे. आत्तापर्यंत […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात Mucor mycosis चं संकट राज्यात गहिरं झालं आहे. समोर आलेली आकडेवारी हेच सांगते आहे. महाराष्ट्रात आज घडीला 4200 च्या जवळ जाऊन पोहचला आहे. तर आत्तापर्यंत राज्यात 120 जणांचा मृत्यू म्युकरमायकोसिस म्हणजेच काळ्या बुरशीमुळे झाला आहे.
ADVERTISEMENT
अशात काळ्या बुरशीवर म्हणजेच म्युकरमायकोसिसवर लागू पडणाऱं Anti Fungal Drug – Amphotericin B या औषधाचा तुटवडा भासतो आहे. आत्तापर्यंत या औषधाचा पुरेसा पुरवठा होत नसल्याचं राज्य सरकारने म्हटलं आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी इंडिया टुडेला यासंदर्भात माहिती दिली. ‘आम्हाला लवकरच या औषधाचा पुरवठा योग्य प्रमाणात होईल अशी आशा आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत हा पुरवठा सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे असंही राजेश टोपेंनी सांगितलं.
काळी बुरशी आजाराची लक्षणं, उपचाराबाबत तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
हे वाचलं का?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः या प्रकरणी जातीने लक्ष घालत आहेत. राज्याला योग्य प्रकारे पुरवठा कसा होईल हे पाहा अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. तसंच यासाठी जे काही करता येईल ते करा अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. एवढंच नाही तर काळ्या बुरशीतून जे रूग्ण बरे झाले आहेत त्याबाबत त्यांनी आरोग्य विभागाचं कौतुकही केलं आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत म्युकरमायकोसिस या रूग्णांवर उपचार केले जात आहेत. महाराष्ट्रातल्या 131 रूग्णालयांमध्ये या योजने अंतर्गत रूग्णांवर उपचार केले जात आहेत अशीही माहिती देण्यात आली आहे.
Black Fungus: अधिक वाफ घेणं ठरु शकतं धोकादायक, ब्लॅक फंगसला देतं निमंत्रण!
ADVERTISEMENT
Black Fungus अर्थात काळी बुरशी ही आपल्या घरातही सापडू शकते. म्युकर मोल्डमुळे ती निर्माण होते. जनावरांचे शेण, माती, सडणारी लाकडं, फळं, कुजलेल्या भाज्या यामुळे ब्लॅक फंगस किंवा काळी बुरशी तयार होते. कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेत आपल्याला याचं प्रमाण वाढताना दिसतं आहे याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे स्टिरॉईड्सचा वाढलेला वापर तर दुसरं कारण आहे ऑक्सिजनसाठीचं अशुद्ध पाणी. मेडिकल ऑक्सिजन आणि इंडस्ट्रीअल ऑक्सिजन यामध्ये बराच फरक आहे. कम्प्रेशन, तो गाळण्याची किंवा शुद्ध करण्याची पद्धती, शुद्धीकरण पद्धत याचे टप्पे वेगवेगळे आहेत. MO अर्थात मेडिकल ऑक्सिजन हा अत्यंत शुद्ध असतो. 99.5 टक्केंपेक्षा जास्त शुद्ध असलेला ऑक्सिजन हा सिलेंडर्समध्ये द्रव रूपात साठवला जातो आणि मग त्याची वाहतूक केली जाते. तसंच वापर झाल्यानंतर सिलिंडर्स निर्जंतुकीकरण करून अत्यंत स्वच्छ केली जातात. या ऑक्सिजनला आर्द्रता आवश्यक असते. प्रोटोकॉलनुसार निर्जंतुक केलेले पाणी वारंवार बदलणं आवश्यक आहे, ते पाणी तसे केले जात नसेल तर काळ्या बुरशीच्या संसर्गाचा तो मुख्य स्त्रोत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT