मुंबईतील कोरोना संसर्गाच्या दर वाढला; सक्रिय रुग्णसंख्येही दीड हजाराने वाढ
कोरोनाची परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचं दिसत आहे. असं असलं तरी मुंबईतील कोरोना आकडेवारीने थोडीशी चिंता वाढवली आहे. मागील २० दिवसांच्या काळावधीत मुंबईतील कोरोना संसर्गाचा दर ०.१ टक्क्याने वाढला असून, याचा परिणाम रुग्ण दुप्पटीच्या दरावर झाल्याचं दिसून येत आहे. तर सक्रिय रुग्णसंख्येत देखील गेल्या पंधरा दिवसांत १५०० पेक्षाही जास्त वाढ झाली आहे. राज्यात आणि मुंबईत कोरोनाची […]
ADVERTISEMENT
कोरोनाची परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचं दिसत आहे. असं असलं तरी मुंबईतील कोरोना आकडेवारीने थोडीशी चिंता वाढवली आहे. मागील २० दिवसांच्या काळावधीत मुंबईतील कोरोना संसर्गाचा दर ०.१ टक्क्याने वाढला असून, याचा परिणाम रुग्ण दुप्पटीच्या दरावर झाल्याचं दिसून येत आहे. तर सक्रिय रुग्णसंख्येत देखील गेल्या पंधरा दिवसांत १५०० पेक्षाही जास्त वाढ झाली आहे.
ADVERTISEMENT
राज्यात आणि मुंबईत कोरोनाची स्थिती सध्यातरी आटोक्यात आहे. दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्याही मर्यादित आहे. मुंबईतील स्थितीही राज्याप्रमाणेच आहे. मात्र, गेल्या २० दिवसांच्या कालावधीत कोरोना संसर्गाच्या दरात किंचित वाढ झाली आहे. या वाढीचा परिणाम म्हणून रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल २०० दिवसांनी कमी झाला आहे.
दरम्यान, १ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या कालावधीतील आकेडवारीतून हे चित्र दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या दीड महिन्यांच्या कालावधीत कोरोना संसर्गाचा दर ०.२ टक्क्यांनी वाढला आहे. २८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत मुंबईतील कोरोना संसर्गाचा दर ०.४ टक्के इतका होता. तो २३ सप्टेंबर रोजी ०.६ टक्के झाला आहे.
हे वाचलं का?
दैनंदिन रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. ऑगस्टच्या सुरूवातीच्या आठवड्यात मुंबईत दररोज साडेतीनशेच्या आसपास कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसांत वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे. सध्या मुंबईत चारशे ते साडेचारशेच्या आसपास रुग्ण दररोज आढळून येत आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्येतही भर पडताना दिसत आहे.
#CoronavirusUpdates
२३ सप्टेंबर, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण-४९७
२४ तासात बरे झालेले रुग्ण-३९५
बरे झालेले एकूण रुग्ण-७१६५११
बरे झालेल्या रुग्णांचा दर-९७%एकूण सक्रिय रुग्ण-४८०१
दुप्पटीचा दर-१२०३ दिवस
कोविड वाढीचा दर (१६ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर)-०.०६%#NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 23, 2021
२३ सप्टेंबर रोजीची आकडेवारी
ADVERTISEMENT
आढळून आलेले बाधित रुग्ण – ४९७
ADVERTISEMENT
बरे होऊन घरी परतलेले रुग्ण – ३९५
बरे झालेले एकूण रुग्ण – ७१६५११
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९७%
एकूण सक्रिय रुग्ण – ४८०१
दुप्पटीचा दर – १२०३ दिवस
कोविड वाढीचा दर (१६ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर) – ०.०६%
१ सप्टेंबर रोजीची आकडेवारी
कोरोना बाधित रुग्ण – ४१६
बरे होऊन घरी परतलेले रुग्ण – ३२९
बरे झालेले एकूण रुग्ण – ७२२९५०
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९७%
एकूण सक्रिय रुग्ण – ३१८७
दुप्पटीचा दर – १४७९ दिवस
कोविड वाढीचा दर (२५ ऑगस्त ते ३१ ऑगस्त)- ०.०५%
४ ऑगस्त रोजीची आकडेवारी
आढळून आलेले बाधित रुग्ण – ३६३
बरे होऊन घरी परतलेले रुग्ण – ४३८
बरे झालेले एकूण रुग्ण – ७१३१६१
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९७%
एकूण सक्रिय रुग्ण- ४५३०
दुप्पटीचा दर – १५९५ दिवस
कोविड वाढीचा दर (२८ जुलै ते ३ ऑगस्त) – ०.०४%
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT