मुंबई मेट्रो फेऱ्यांमध्ये वाढ करणार, वाढत्या गर्दीमुळे प्रशासनाचा निर्णय
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ महापालिका प्रशासनासाठी चिंतेची बाब बनली आहे. एकीकडे महापालिका प्रशासन शहरात निर्बंध कडक करण्याचा विचार करत असताना मुंबईतील मेट्रो प्रशासनाने फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. २२ मार्चपासून मुंबई मेट्रो प्रशासन घाटकोपर ते वर्सोवा मार्गावर २८० फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. याआधी घाटकोपर-वर्सोवा मार्गावर २५६ फेऱ्या चालवल्या जात […]
ADVERTISEMENT

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ महापालिका प्रशासनासाठी चिंतेची बाब बनली आहे. एकीकडे महापालिका प्रशासन शहरात निर्बंध कडक करण्याचा विचार करत असताना मुंबईतील मेट्रो प्रशासनाने फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. २२ मार्चपासून मुंबई मेट्रो प्रशासन घाटकोपर ते वर्सोवा मार्गावर २८० फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. याआधी घाटकोपर-वर्सोवा मार्गावर २५६ फेऱ्या चालवल्या जात होत्या. यामुळे मेट्रोच्या मार्गावर होणारी गर्दी कमी होण्यास मदत होईल असं मत मुंबई मेट्रोच्या प्रशासनाने व्यक्त केलंय.
नागपुरात 31 मार्चपर्यंत कडक निर्बंध कायम राहणार: नितीन राऊत
कोरोना काळातही मुंबई मेट्रो मार्गावर (शनिवार-रविवार चा अपवाद वगळता) सध्या १ लाखापेक्षा जास्त प्रवासी दररोज प्रवास करत आहेत. एरवी याच मार्गावर दररोज साडेचार लाख प्रवासी प्रवास करायचे. घाटकोपर – वर्सोवा ही सध्या मुंबईत सुरु असलेली एकमेव मेट्रो सेवा आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो प्रशासन आरोग्यविषयक सर्व नियमांचं पालन करत आहे.
मुंबईकरांनो Mall मध्ये जाण्याचा प्लान करताय? मग ही बातमी वाचाच !
