Mumbai Police : सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील सेवेतून निलंबित

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मेघवाडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी (Assistant Commissioner of Police) कार्यरत असलेल्या सुजाता पाटील (sujata Patil) यांना निलंबित करण्यात आलं आहे. सुजाता पाटील यांना 40 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली होती. जामीनावर सुटका झाल्यानंतर शासनाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. (Assistant Commissioner of Police Sujata Patil suspended from service)

ADVERTISEMENT

सुजाता पाटील यांना एक लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी आणि त्यापैकी 40 हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलं होतं. सुजाता पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत एसीबीने त्यांना अटक केली होती. दरम्यान, त्यांची न्यायालयाने जामीनावर सुटका केली असून, त्यानंतर शासनाने पाटील यांचं सेवेतून निलंबन करण्याचा निर्णय घेतला.

सुजाता पाटील आणि एक लाखाची लाच; प्रकरण नेमकं काय?

हे वाचलं का?

मेघवाडी विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी कार्यरत असताना सुजाता पाटील यांच्याकडे जोगेश्वरी पोलीस ठाण्याची जबाबदारी होती. दरम्यान, जोगेश्वरी येथील एका तक्रारदाराने सुजाता पाटील यांच्याकडून लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार एसीबीकडे दिली होती.

तक्रारदाराचा एक गाळा आहे. तो गाळा त्यांनी एका महिलेला भाडेतत्वावर दिला होता. दरम्यान 5 ऑक्टोबर रोजी त्यांनी भाडेकरून तो गाळा ताब्यात घेतला. तरीही भाडेकरू महिलेसह इतरांनी गाळ्याचं कुलूप तोडून गाळ्यात घुसखोरी केली होती.

ADVERTISEMENT

याप्रकरणी गाळा मालकाने भाडेकरुविरुद्ध जोगेश्वरी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांकडून त्यांच्या तक्रारीची दखल न घेतल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर गाळा मालकाने एसीपी सुजाता पाटील यांची यासंदर्भात भेट घेतली होती.

ADVERTISEMENT

यावेळी सुजाता पाटील यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. पाटील यांनी दहा रुपये भेटीच्या दिवशीच घेतले, तर उर्वरित रकमेची पाटील यांच्याकडून गाळा मालकाकडे तक्रार केली जात होती. त्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली. एसीबीने 40 हजारांचा लाच घेताना पाटील यांना अटक केली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT