अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी सानिया चंडोक वर्षाला कमावते इतके कोटी, आकडा पाहून थक्क व्हाल

sania chandok : अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चंडोकच्या कमाईबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

sania chandok
sania chandok
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अर्जुन तेंडुलकर चर्चेचा विषय

point

अर्जुनची होणारी पत्नी सानिया चंडोक कोण?

point

सानिया चंडोकचा इमकम किती?

sania chandok : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आता सासरा होणार आहे. त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने एका उद्योगपतीच्या तरुणीशी साखरपुडा केल्याच्या अनेक बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. यामुळे अर्जुन तेंडुलकर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अर्जुनच्या होणाऱ्या बायकोचं नाव सानिया चंडोक असे आहे. अनेक लोक तिचं नाव गुगलवर शोधताना दिसत आहेत. नेमकी सानिया चंडोक कोण आहे? तिचा इनकम किती आहे? असे अनेकांना प्रश्न पडू लागले आहेत.

हे ही वाचा : जळगाव हादरलं ! कॅफेत मैत्रिणीसोबत बसला सुलेमान, जमाव आला अन् गुरासाखं मारलं, आई-वडील सोडवायला गेले अन्...

सानिया चंडोकची कमाई किती ? 

सानिया चंडोक ही एक पाळिव प्राण्यांची चाहती आहे. तिने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स बिझनेस मॅनेजमेंटमधून पदवी मिळवली. सानिया चंडोकने आपल्या शिक्षणानंतर पाळिव प्राण्यांच्या उद्योग क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं आहे. तिने एक मोठं लग्जरी पेट स्पा खोललं आहे. त्या स्पा सेंटरचं Mr. Paws Pet Spa & Store LLP नाव आहे. यातून एका वर्षात ती 90 लाखांची कमाई करते, अशी माहिती समोर आली.

संबंधित स्पा सेंटरमध्ये कुत्रा आणि मांजरसारख्या पाळीव प्राण्यांवर उपचार केले जातात. कोरियन आणि जपानमध्ये पाळीव प्राण्यांवर ज्यापद्धतीने उपचार केले जातात, तसेच उपचार या स्पा सेंटरमध्ये करता येतात. सानिया स्वत: पेट्स स्पा सेंटरमध्ये असते, तिला पाळीव प्राण्यांची काळजी घ्यायला आवडते.

'या' बड्या उद्योगपतींची सोनिया चंडोक नात 

सानिया चंडोक मुंबईतील मोठ्या कुटुंबातील आहे. तिचे आजोबा रवी घई हे ग्रॅव्हिस ग्रुपचे मालक आहेत. ते मिळून अनेक व्यवसाय चालवतात. हाच ग्रुप ब्रुकलिन क्रीमरी आणि बास्कीन-रॉबिन्स इंडिया नावाचे आइस्क्रीम ब्रँड चालवतो. तिच्या कुटुंबाचं इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल देखील आहे. त्यांची असंख्य कोटींची उलाढाल आहे.

हे ही वाचा : मित्राने तरुणीला पार्टीला बोलावले, नंतर दारूत मिसळले औषध, तिला बाथरूममध्ये नेलं अन् आळीपाळीने सर्वांनीच...

सानिया चांडोक आणि अर्जुन तेंडुलकर हे एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. दोघांच्याही कुटुंबाचे एकमेकांशी जवळचे संबंध आहे. सानिया चांडोक आणि अर्जुनची बहीण सारा तेंडुलकर देखील बऱ्याच काळापासून चांगल्या मैत्रिणी आहेत, म्हणूनच सानिया आणि अर्जुन अनेकदा भेटत असतात. सानियाची पहिली ओळख अर्जुनची बहीण साराने करून दिली होती. सध्या सारा तिच्या जवळच्या मैत्रिणीला तिच्याच भावाची पत्नी बनवत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp