कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या अन् बरंच काही..पालक हे सर्व मुलांच्या बॅगेत का ठेवतायत? कारणं वाचून झोपच उडेल!

Today Shocking Viral News :  कंडोम, नार्कन आणि गर्भनिरोधक गोळ्या किंवा प्लान बी, सारख्या गोष्टी अमेरिकेतील पालक कॉलेजला जाणाऱ्या मुलांच्या बॅगेत ठेवतात. या पालकांचं म्हणणं आहे की, हे कॉलेज सर्वायव्हल किट आहे.

Today Shocking Viral Story
Today Shocking Viral Story
social share
google news

बातम्या हायलाइट

point

काय असतं नार्कन?

point

एका व्हिडीओमुळं तो किट चर्चेत आला

point

ड्रग्जच्या सेवनामुळे अमेरिकेतील तरुणांचा होतो मृत्यू

Today Shocking Viral News :  कंडोम, नार्कन आणि गर्भनिरोधक गोळ्या किंवा प्लान बी, सारख्या गोष्टी अमेरिकेतील पालक कॉलेजला जाणाऱ्या मुलांच्या बॅगेत ठेवतात. या पालकांचं म्हणणं आहे की, हे कॉलेज सर्वायव्हल किट आहे. एका महिला अन् तिच्या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला होता. ही महिला तिच्या मुलीची बॅग रेडी करत असते आणि तिला तिच्या सर्वायव्हल किटबाबत चिंता वाटते, असं या व्हिडीओत होतं. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांची बॅग पॅक करताना काळजी वाटते. त्यामुळे पालक त्यांच्या मुलांच्या बॅगेत नार्कन, नैसल स्प्रै, तसच कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांचाही त्यांच्या लिस्टमध्ये समावेश आहे.

काय असतं नार्कन?

समर नावाच्या विद्यार्थ्याने द पोस्टला सांगितलं की, मी एका तरुणीला नार्कन दिलं, जेव्हा ती एका पार्टीनंतर कॅम्पसच्या बाहेर असलेल्या लॉनमध्ये बेशुद्ध झाली होती. या स्प्रेमुळं अनेकांचं आयुष्य सुरक्षीत राहतं. नार्कन ज्याला अधिकृतपणे नालोक्सोन नावानं ओळखलं जातं. फेंटेनाईल सारख्या अवैध पदार्थांचं सेवन केल्यानंतर नार्कनचा वापर केला जातो. जेणेकरून कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम होत नाही.  यामुळेच 20 वर्षांच्या समरसारख्या विद्यार्थ्याला बॅगमध्ये नार्कनसारख्या गोष्टी ठेवाव्या लागतात.

एका व्हिडीओमुळं तो किट चर्चेत आला

फेसबुक मॉम ग्रुप्सपासून ते व्हायरल टिकटॉक क्लिप्सपर्यंत, या चमत्कारिक औषधाला कॉलेज सर्वायव्हल किटमध्ये गर्भनिरोधक गोळ्या आणि कंडोमसोबतच स्थान मिळालं आहे. इडाहो येथील 42 वर्षांची महिला आणि तिची 18 वर्षांची मुलगी सोफिया ग्रीनने नुकतच या किटबाबत माहिती देत सोशल मीडियावर खळबळ उडवली होती. 

हे ही वाचा >> pune crime : तरुण काकीला 'I Love You' म्हणाला, भावाची सटकली, नंतर भररस्त्यात हॉकी स्टिकने केली अमानुष मारहाण

त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला जवळपास 5.6 मिलियन व्ह्यूज मिळाले होते. महिलाने तिच्या मुलीच्या बॅगेत ज्या गोष्टी ठेवल्या होत्या, त्याबाबत काही लोकांनी समर्थन केलं होतं. तर काही लोकांनी टीकाही केली होती. एका यूजरने म्हटलं होतं की, तुमच्या मुलांना सामान्य ज्ञान शिकवा. त्यांना फ्लेक्सिबल कसं व्हायचं, ते शिकवा. मजबूत इच्छाशक्ती विकसित करणं शिकवा. 

एनवाययू लैंगोन हेल्थ सेंटरचे सायकोलॉजिस्ट यामालिस डियाजने म्हटलं होतं की, जे पालक सतर्क झाले आहेत, ते त्यांच्या मर्यादांचं उल्लंघन करत आहेत. तसच ते त्यांना पार्टी करण्यासाठी किंवा या गोष्टींचा वापर करण्याची परवानगी देत नाहीत. ते फक्त त्यांच्या मुलांना वास्तविक जगातील कल्चरसाठी तयार करत आहेत. डियाज यांनी द पोस्टला सांगितलं की, मिलेनियल्स आणि जनरेशन एक्सर्स, जे खूप फ्री लाईफस्टाईल जगतात, आता आपल्या जनरेशन-झेड मुलांना कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सक्रीय करून कॉलेजला पाठवत आहेत. 

हे ही वाचा >> Pune: पुनीत बालन ग्रुपचा मोठा निर्णय, DJ मुक्त दहीहंडी करणार साजरी

ड्रग्जच्या सेवनामुळे अमेरिकेतील तरुणांचा होतो मृत्यू

डीईए (ड्रग्ज एन्फोर्समेंट एजेन्सी) च्या कॅम्पस ड्रग प्रिव्हेंशन साईटनुसार, ड्रग एन्फोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशनच्या प्रतिनिधींनी फेंटेनाईल, जे अनुसूची Iचं औषध आहे. जे अमेरिकेत 18   ते   45 वर्ष वयोमर्यादा असणाऱ्या लोकांच्या मृत्यूचं प्रमुख कारण बनलं आहे. समरच्या मैत्रिणीलाही याचा फटका बसला असता. पण सुदैवाने त्या तरुणीनं ड्रग्जविरोधी काम करणाऱ्या सेमिनारमध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे तिला या गोष्टींच्या परिणामांची कल्पना होती. 

हे वाचलं का?

    follow whatsapp