आईने बाळाला दिलं दत्तक, 35 वर्षानंतर त्याच तरुणाशी आईचा विवाह, डीएनए तपासणीनंतर...काटा आणणारं वास्तव

viral video : लहानपणी महिलेनं एका लहान बाळाला दुसऱ्या कुटुंबाला दत्तक दिले होते. मात्र, नकळत काही वर्षानंतर त्यांची ओळख झाली आणि त्यांनी विवाह केला. त्यानंतर जे काही घडलं ते वाचून अंगावरचा थरकाप उडेल.

viral video (grok)
viral video
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आई-मुलाच्या नात्याला काळिमा

point

आईनं मुलाशी केलं लग्न

point

नेमकं प्रकरण काय?

viral video : आई-वडील आणि मुलाच्या नात्यासारखं नातं या जगात कुठेच नाही. मात्र, याच नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेनं आपले लहान बाळा 35 वर्षांपूर्वी दुसऱ्या कुटुंबाला दत्तक दिलं होतं. काही वर्षानंतर त्या महिलेनं दत्तक दिलेल्या मुलाशीच विवाह केला. या लग्नानंतर त्यांना दोन मुलंही झाली. काही वर्षानंतर दोघांनीही रक्त तपासणी केली असता, खरं सत्य समोर आलं आहे. या घटनेनं कुटुंबीयांच्या पायाखालची जमिनीच सरकली. महिलेनं या मागील खरं सत्य सांगितलं आणि संबंधित प्रकरणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

हे ही वाचा : लेकीच्या संसारात सासू करायची लुडबुड, अखेर जावयाची सटकली, मटण तोडल्यासारखे केले 19 तुकडे, पोलिसांचीही टरकली

नेमकं काय घडलं? 

दरम्यान, महिलेनं आणि तिच्या पतीने त्यांच्या मुलांच्या भविष्याबाबत काही कायदेशीररित्या सल्ला घेण्याचा विचार केला. या काळात त्यांनी रक्त तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच खरं काय ते सत्य समोर आलं. रिपोर्ट तपासल्यानंतर सिद्ध झाले की, महिलेनं ज्या तरुणाशी विवाह केला होता तो दुसरा तिसरा कोणीही नसून दत्तक दिलेला तिचाच मुलगा होता.

लहान बाळाला दत्तक दिल्यानंतर संबंधित महिला तिच्या मुलाला कधीही भेटली नाही. परंतु, काही वर्षानंतर आईच तिच्या दत्तक दिलेल्या मुलाला भेटली. नंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात वेडेपीसे झाले होते. त्यानंतर दोघांनीही विवाह केला आणि त्यानंतर त्यांना दोन मुलंही झाली. सर्व काही सुरळत सुरू होतं दोघांची डीएनएन चाचणी करण्यात आली असता, दोघांच्या नात्याबाबत मोठा खुलासा झाला. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by 6TH WAVE (@6thxwave)

व्हिडिओ पाहिल्यानंतर कळते की, महिला 2015 मध्ये तिच्या 21 वर्षीय पतीला (तत्कालीन दत्तक मुलगा) भेटली होती. त्यानंतर एका वर्षात म्हणजेच 2016 मध्ये पहिले मूल झाले आणि दुसऱ्या वर्षी म्हणजेच 2017 मध्ये दुसरे मूल जन्माला आले होते.

आईने आपल्या मुलाला कसं ओळखलं नाही?

दरम्यान, आईने आपल्या मुलाला कसं ओळखलं नाही? असा प्रश्न तु्म्हालाही पडला असेल. संबंधित मुलाचा जन्म झालेल्या बाळाला त्याच्या आईनं दुसऱ्याला दत्तक दिलं होतं. महिलेचं वयही फार नव्हतं आणि तिची आर्थिक स्थितीही चांगली नव्हती. अनेक वर्षानंतर ती आपल्या मुलाला भेटली असता, दोघांनाही एकमेकांबाबत कसलीही माहिती मिळाली नाही. दोघांनीही अगदी साधेपणाने जीवन जगणे सुरुच ठेवले होते. मात्र, त्या एका तपासणीमुळे हे नातेसंबंध समोर आले.

हे ही वाचा : pune crime : तरुण काकीला 'I Love You' म्हणाला, भावाची सटकली, नंतर भररस्त्यात हॉकी स्टिकने केली अमानुष मारहाण

डीएनए तपासणीमुळे नातं आलं समोर

त्यांच्या लग्नानंतरही त्यांना आपल्या मूळ नात्याबाबत कसलीही माहिती नव्हती. मात्र, डीएनए तपासणीमुळे दोघांचे मूळ नातेसंबंध समोर आले. त्या दोघांनीही आपलं नातं संपण्याचा निर्णय घेतला. पण, यामुळे त्यांच्या मुलांचं भविष्य अंधारात आले. या घटनेमुळे सिद्ध झाले की, अनेक नाती जपता येतात. मात्र, खरं रक्ताचं नातं लपवता येत नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp