मुंबईची खबर: आता फेरी बोटींच्या सुरक्षिततेचा प्रश्नच मिटला... प्रत्येक बोट सीसीटीव्हीच्या नजरेत अन्...
समुद्री सुरक्षितता लक्षात घेऊन मुंबईतील फेरी बोटचालक आणि संचालकांकडून मोठा निर्णय घेण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. समुद्रात धावणाऱ्या लाकडी फेरी बोटींवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे.

बातम्या हायलाइट

मुंबईच्या फेरी बोटींवर सीसीटीव्हीची नजर

समुद्री सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठा निर्णय
Mumbai News: काही महिन्यांपूर्वी मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटा बेटाकडे जाणाऱ्या एका लाकडी फेरी बोटीला अपघात झाल्याची बातमी समोर आली होती. या भीषण घटनेनंतर समुद्री सुरक्षिततेच्या दृष्टीने बरेच प्रश्न उपस्थित केले गेले. आता, हीच सुरक्षितता लक्षात घेऊन फेरी बोटचालक आणि संचालकांकडून मोठा निर्णय घेण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. समुद्रात धावणाऱ्या लाकडी फेरी बोटींवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे.
आतापर्यंत सात बोटींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे...
पुढच्या महिन्यापासून म्हणजेच येत्या 1 सप्टेंबरपासून समुद्रात धावणाऱ्या लाकडी फेरी बोटी सीसीटीव्हीच्या नजरेखाली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एलिफंटा, मांडवा, रेवस मार्गावरील सुरक्षितता बळकट करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या बोटींवर टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही बसवण्यात येणार असून आतापर्यंत सात बोटींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
हे ही वाचा: आरारारारा! पोरांनी स्मार्ट स्क्रीनवर पाहिला अश्लील चित्रपट..एकाने Video थेट मुख्याध्यापकांना दाखवला अन्..सरकारी शाळेत उडाली खळबळ!
प्रवाशांवर देखरेख अन् व्यवहारातील पारदर्शकता
प्रत्येक फेरी बोटीवर उत्तम दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. बोटीवरील प्रवासी क्षेत्र, बोटीचं प्रवेशद्वार, डेक आणि चालकाची केबिन सीसीटीव्हीच्या नजरेखाली असणार आहे. या निर्णयामुळे आपत्कालीन परिस्थिती, अपघात रोखण्यास मदत होणार आहे. त्याचसोबत, तिकीट व्यवहारातील पारदर्शकता, कर्मचाऱ्यांचं कामकाज आणि नियमभंग करणाऱ्या प्रवाशांवर देखरेख ठेवता येईल. तसेच, फेरी बोटीवर सीसीटीव्हीची नजर असल्याकारणाने पर्यटनाच्या गुणवत्तेत वाढ होणार आहे.
हे ही वाचा: NASA च्या इंटर्नने चंद्राचा तुकडा चोरला..बेडखाली ठेऊन गर्लफ्रेंडसोबत रोमान्स केलं अन् नंतर सगळंच व्हायरल झालं!
दशकांपासून प्रवासी वाहतूक
खरंतर, मुंबई आणि आसपासच्या समुद्रकिनारी असलेली गावे, छोटी बंदरे आणि पर्यटनस्थळांना मुख्य भूमीशी जोडणारी प्रवासी वाहतूक म्हणून फेरी बोटींचं नाव घेतलं जातं. या बोटी दशकांपासून प्रवासी वाहतूक करत असल्याचं सांगितलं जातं. भाऊचा धक्का ते रेवस, उरण, मोरा तसेच गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा, एलिफंटा, अलिबाग या मार्गांवर आजही ही सेवा सुरू असल्याचं पाहायला मिळतं.