Mumbai Weather Today: मुंबईसह ठाणे आणि आजूबाजूच्या जिल्ह्यासाठी भारतीय हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी, आजचं हवामान घ्या जाणून
Mumbai Weather Today: मुंबईसह ठाणे आणि आजूबाजूच्या जिल्ह्यासाठी भारतीय हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे अनेक भागात जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील हवामानाचा नेमका अंदाज भारतीय हवामान खात्याच्या (IMD) वर्तवला आहे. जाणून घ्या आज (13 ऑगस्ट) रोजी मुंबईसह MMRDA रिजनमध्ये नेमकं कसं वातावरण असेल. मुंबईत सध्या पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे मुंबईत बराच उष्मा जाणवू लागला आहे. पण आता हवामान खात्याने मुंबईसह नजीकच्या सर्व जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आज मुंबईत जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान अंदाज
मुंबई - 13 ऑगस्ट रोजी मुंबईत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असून, काही ठिकाणी दुपारनंतर किंवा संध्याकाळी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 29 ते 31°सेल्सिअस आणि किमान तापमान 24 ते 26°सेल्सिअस दरम्यान राहू शकते. आर्द्रता 75% ते 85% पर्यंत राहील. तर गडगडाटासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा>> मुंबईतील सुंदर महिलेचा तो कारनामा अन् एक्स बॉयफ्रेंडला... शरीरसंबंध की भलतंच काही...
ठाणे - ठाणे परिसरात देखील ढगाळ वातावरण आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. काही भागात जोरदार सरींचा इशारा आहे, विशेषतः संध्याकाळी त्यामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगावी.
नवी मुंबई - नवी मुंबईत सकाळपासून हलक्या पावसाची सुरुवात होऊ शकते, जे दुपारी मध्यम ते जोरदार पावसात रूपांतरित होण्याची शक्यता आहे.










