Govt Job: इंडियन नेव्हीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी... 'या' पदांसाठी निघाली बंपर भरती
'इंडियन नेव्ही' म्हणजेच भारतीय नौदलाकडून 'सिव्हिलिअन ट्रेड्समॅन स्किल्ड'च्या रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

बातम्या हायलाइट

इंडियन नेव्हीमध्ये निघाली बंपर भरती

काय आहे पात्रता?
Govt Job: देशसेवेत रुजु होऊ पाहणाऱ्या होतकरु तरुणांसाठी सरकरी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. 'इंडियन नेव्ही' म्हणजेच भारतीय नौदलाकडून 'सिव्हिलिअन ट्रेड्समॅन स्किल्ड'च्या रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 1200 हून रिक्त जागांसाठी भरती निघाली असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार indiannavy.gov.in या 'इंडियन नेव्ही'च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
'या' पदांसाठी निघाली भरती
- सहाय्यक: 49 पदे
- सिव्हिल वर्क्स: 17 पदे
- इलेक्ट्रिकल: 172 पदे
- इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड जायरो – 50 पदे
- पॅटर्न मेकर / माउल्डर / फाउंड्रीमॅन – 09 पदे
- हील इंजिन – 121 पदे
- इंस्ट्रूमेंट – 09 पदे
- मशीन – 56 पदे
- मॅकेनिकल सिस्टम – 79 पदे
- मॅकेट्रॉनिक्स – 23 पदे
- मेटल – 217 पदे
- मिलराइट – 28 पदे
- रेफ्रिजरेशन अॅण्ड एसी – 17 पदे
- शिप बिल्डिंग – 228 पदे
- वेपन इलेक्ट्रॉनिक्स – 49 पदे
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 10 उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. यासोबतच, उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिप ट्रेनिंग पूर्ण, मेकॅनिक किंवा समकक्ष व्यापारात आर्मी, नेव्ही वा एअर फोर्समध्ये 2 वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे.
हे ही वाचा: अर्जुन तेंडुलकरने बालपणीच्या मैत्रिणीसोबतच उरकला साखरपुडा... सानिया चंडोक नेमकी आहे तरी कोण?
वयोमर्यादा
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 19900 रुपये ते 63200 रुपयांपर्यंत वेतन मिळेल. यासोबतच संबंधित पदांवर कार्यरत असणाऱ्या उमेदवारांना इतर सरकारी भत्ते देखील देण्यात येतील.
निवड प्रक्रिया
1. लेखी परीक्षा: 100 गुणांसाठी प्रश्न विचारले जातील
2. डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन
3. मेडिकल टेस्ट
हे ही वाचा: बाथरूममध्ये गेली की सूनेकडे टक लावून... एके दिवशी मागून आला अन्... सासऱ्याचं घृणास्पद कृत्य उघडकीस
कसा कराल अर्ज?
1. सर्वप्रथम onlineregistrationportal.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. होमपेजवरील 'Recruitment' सेक्शनमध्ये जा.
3. त्यानंतर Civilian Tradesman Skilled 2025 या लिंकवर क्लिक करा.
4. आधी रजिस्ट्रेशन करुन नंतर लॉगिन करा.
5. त्यानंतर विचारण्यात आलेली माहिती आणि आवश्यक डॉक्यूमेंट्स अपलोड करा.
6. ऑनलाइन माध्यमातून फी भरा.
7. त्यानंतर फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून ती सुरक्षितरित्या ठेवा.