पतीच्या मृत्यूनंतर दीरासोबत केलं लग्न! नंतर दोन्ही मुलांसह नदीत उडी मारून जीवन संपवलं..पोलिसांना सापडली ती चिठ्ठी अन्..
Woman Ends Life With Children : पती आणि सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून एका महिलेनं जीवन संपवलं. महिलेनं दोन्ही मुलांसह आयुष्याचा द एंड केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

बातम्या हायलाइट

हुंडा अन् सोन्याची मागणी करत महिलेचा केला छळ

पतीच्या मृत्यूनंतर महिलेचं दीरासोबत लावलं लग्न

बाराबंकीच्या मिथिलेश कुमारी यादवसोबत नेमकं काय घडलं?
Woman Ends Life With Children : पती आणि सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून एका महिलेनं जीवन संपवलं. महिलेनं दोन्ही मुलांसह आयुष्याचा द एंड केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. उत्तरप्रदेशच्या बाराबंकी येथे ही धक्कादायक घटना घडली. महिलेनं आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या जीवनात जे काही घडलं ते सुसाईड नोटमध्ये लिहिलं.
बाराबंकीच्या मिथिलेश कुमारी यादवसोबत नेमकं काय घडलं?
बाराबंकी येथे एक दुर्देवी घटना घडली. येथे राहणाऱ्या एका विवाहितेनं दोन मुलांसह नदीत उडी मारून स्वत:चं जीवन संपवलं. सासरच्या लोकांनी मानसिक छळ आणि हुंड्याची मागणी केल्यामुळं महिलेनं टोकाचं पाऊल उचलल्याचं समजते. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोटही सापडलं आहे. या सुसाईड नोटमध्ये महिलेनं आत्महत्येचं कारण नमूद केलं आहे.
हे ही वाचा >> मुंबईची खबर: MHADA Lottery- आता घरच नव्हे तर दुकानं सुद्धा मिळतील अगदी स्वस्तात... म्हाडाच्या 'ई-लिलाव'बद्दल माहितीये?
ही घटना बाराबंकीच्या कोठी पोलीस स्टेशनच्या हद्दीत बीबियापूर घाट परिसरात घडली. येथे गुरुवारी 27 वर्षांच्या मिथिलेश कुमारी यादवने तिच्या दोन मुलांसह नदीत उडी मारून आयुष्य संपवलं. अशं 4 वर्षांचा होता तर अभय हा 6 वर्षांचा होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर गोताखोरांच्या मदतीनं तिघांचेही मृतदेह नदीच्या पाण्यात शोधून काढले.
हुंड्याच्या मागणीसाठी महिलेचा केला छळ
पोलिसांच्या माहितीनुसार, महिलेनं घटनेआधी बाराबंकी येथील पोलीस अधिक्षकांना एक पत्र पाठवलं होतं. त्यामध्ये महिलेनं सासरच्या लोकांनी तिचा हुंड्यासाठी मानसिक छळ होत असल्याचं म्हटलं होतं. पण त्यानंतरही सासरच्यांनी तिचा छळ सुरुच ठेवला आणि महिलेनं केलेल्या आरोपांचं खंडनही केलं. दरम्यान, पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
हे ही वाचा >> Pune crime : लोखंडी रॉडसह फावड्याने तरुणाला अमानुष मारहाण, नंतर हल्लेखोर स्वत:हून पोलिसांकडे गेले अन्...
पतीच्या मृत्यूनंतर महिलेचं दीरासोबत लावलं लग्न
महिलेनं सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं की, तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. कुटुंबियांनी पतीच्या मृत्यूनंतर तिचं लग्न दीरासोबत लावलं होतं. तरीही सासरच्यांनी तिला त्रास दिला. ते सतत हुंड्याची मागणी करत होते आणि तिचा मानसिक छळ करत होते. दरम्यान, सासरच्या लोकांनी महिलेनं केलेले आरोप फेटाळले आहेत.