चाकरमान्यांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी 2 स्पेशल 'मोदी एक्स्प्रेस', कोकणात जाण्यासाठी कसं मिळणार तिकीट?
Modi Express Time Table And Ticket Process : मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आगामी गणेशोत्सवाच्या निमित्तानं मुंबई शहर आणि परिसरातील चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी एक स्पेशल ट्रेन सुरु केली जाणार आहे.

बातम्या हायलाइट

कधी धावणार स्पेशल ट्रेन?

मंत्री नितेश राणे काय म्हणाले?

कशी मिळणार तिकीट ?
Modi Express Time Table And Ticket Process : मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आगामी गणेशोत्सवाच्या निमित्तानं मुंबई शहर आणि परिसरातील चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी एक स्पेशल ट्रेन सुरु केली जाणार आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून दोन मोदी एक्स्प्रेस गणपती स्पेशल म्हणून सुरु केली जाणार आहे. विशेष म्हणजे या एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना मोफत भोजनही मिळणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवाआधी चाकरमान्यांना दोन स्पेशल एक्स्प्रेसची सुविधा मिळणार असल्यानं, चाकरमान्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
मोदी एक्स्प्रेस
कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरु झाली आहे. अशाप्रकारे कोकणवासी आता मुंबईहून त्यांच्या गावी जाण्यासाठी ट्रेनची तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करत आहेत. रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून अनेक अतिरिक्त ट्रेनही सुरु केल्या आहेत. काही ट्रेनची बुकिंग आधीच फुल्ल झाली आहे. यावर्षी एक नव्हे तर दोन मोदी एक्स्प्रेस चालवल्या जाणार आहेत, अशी माहिती भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी दिलीय.
कधी धावणार स्पेशल ट्रेन?
मोदी एक्स्प्रेस 23 आणि 24 ऑगस्ट दोन्ही दिवस कोकणसाठी रवाना होणार आहेत. त्यामुळे मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांना त्यांच्या गावी म्हणजेच कोकणात जाण्यासाठी दिलासा मिळाला आहे. मंत्री नितेश राणेंनी नुकतीच दोन मोदी एक्स्प्रेसची घोषणा केली. या दोन्ही ट्रेन दादर स्टेशनहून रवाना होणार आहेत. या ट्रेनचे तिकीट 18 तारखेपासून वितरित करण्यात येणार आहेत.
हे ही वाचा >> मुंबईची खबर: MHADA Lottery- आता घरच नव्हे तर दुकानं सुद्धा मिळतील अगदी स्वस्तात... म्हाडाच्या 'ई-लिलाव'बद्दल माहितीये?
मंत्री नितेश राणे काय म्हणाले?
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोकणच्या रहिवाशांनी महायुतीला बहुमत दिलं. त्यामुळे नितेश राणे तिसऱ्यांदा आमदार झाले. तर माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही खासदार बनवून लोकसभेत पाठवलं. म्हणून ही एक्स्प्रेस यावर्षी दोन दिवसांसाठी रवाना होणार आहे. कोकणच्या लोकांनी आम्हाला भरपूर समर्थन दिलं आहे, असं म्हणत नितेश राणे यांनी लोकांचे आभार मानले.
कशी मिळणार तिकीट ?
या ट्रेन दादर रेल्वे स्टेशनहून दोन दिवस 23 आणि 24 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता रवाना होणार आहे. यासाठी तिकिटांचं वितरण सोमवारी 18 ऑगस्ट 2025 पासून सुरु होणार आहे. लोकांना तिकीटसाठी आपापले बोर्ड किंवा अध्यक्षांकडे नाव रसिस्टर्ड करावं लागेल. नितेश राणेंनी सांगितलं की, शनिवारी 23 ऑगस्ट रोजी दादर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 14 वर सकाळी 11 वाजता रवाना होणारी ट्रेन वैभववाडी आणि कणकवलीत थांबेल.