अरे बापरे...इमारतीच्या बाल्कनीला लटकली दोन लहान मुलं! 13 व्या मजल्यावर घडलं तरी काय? Video पाहून थरकापच उडेल
Today Shocking Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हायरल व्हिडीओ पाहायला मिळतात. काही व्हिडीओ पाहून लोकांना आश्चर्याचा धक्काच बसतो. तर काही व्हिडीओ काळीज पिळवटून टाकणारे असतात.

बातम्या हायलाइट

लहान मुलांच्या व्हायरल व्हिडीओमुळं उडाली खळबळ

व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही बसला धक्का

त्या इमारतीत नेमकं काय घडलं?
Today Shocking Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हायरल व्हिडीओ पाहायला मिळतात. काही व्हिडीओ पाहून लोकांना आश्चर्याचा धक्काच बसतो. तर काही व्हिडीओ काळीज पिळवटून टाकणारे असतात. अशाचप्रकारचा एक व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ चीनच्या उंच इमारतीचा असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, छोटी मुलं 13 व्या मजल्याच्या बाल्कनीत खतरनाक पद्धतीने लटकली आहेत. हृदय हेलावून टाकणारं हे दृष्य पाहून अनकांना हादराच बसला आहे.
लहान मुलांच्या व्हायरल व्हिडीओमुळं उडाली खळबळ
इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ @nihaochongqing नावाच्या यूजरने शेअर केला आहे. भयानक..असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. दोन मुलं खेळण्यासाठी 13 व्या मजल्याच्या बाल्कनीतून बाहेर चढले आणि वेगवेगळे कृत्य करू लागले. पण त्यानंतर या मुलांनी स्वत:ला सावरलं आणि धोका टळला. दरम्यान, आई-वडिलांनी त्यांच्या मुलांवर नजर ठेवली पाहिजे आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क राहिलं पाहिजे.
हे ही वाचा >> मुंबईची खबर: MHADA Lottery- आता घरच नव्हे तर दुकानं सुद्धा मिळतील अगदी स्वस्तात... म्हाडाच्या 'ई-लिलाव'बद्दल माहितीये?
या इमारतीचा खतरनाक व्हिडीओ शेजाऱ्यांनी काढला अन् व्हिडीओ व्हायरल झाला.व्हायरल क्लिपमध्ये दोन मुलं रेलिंगला घट्ट पकडून लटकल्याचं पाहायला मिळत आहे. पण आई-वडिलांच्या बेजबाबदारपणामुळे मुलं खिडकीच्या बाहेर आली, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.
व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही बसला धक्का
एका यूजरने म्हटलंय, किती बेजबाबदार आई-वडील आहेत. त्यांना तर तुरुंगवास झाला पाहिजे. दुसऱ्या यूजरने म्हटलं, हे भगवान! हे भयानक दृष्य पाहून माझं काळीज फाटलं. कसे आई-वडील आहेत..अन्य एका यूजरने म्हटलं, मुलं सेफ तर आहेत ना?? तर अनेक यूजर्सने म्हटलंय की, अंगावर शहारा आणणारा हा व्हिडीओ आहे.
हे ही वाचा >> 'इतकी' सुंदर दिसते अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी! 'या' लेटेस्ट फोटोंमध्ये पाहा झलक
या व्हिडीओला हजारो लोकांनी लाईक आणि शेअर केलं आहे. तसच या व्हिडीओला 11 लाखांहून अधिक व्हूज मिळाले आहेत. व्हिडीओला कमेंट करत लिजा नावाच्या महिलेनं म्हटलं की, आई-वडील कुठे झोपले आहेत..मुलांना वाचवण्यासाठी कुणीतरी संबंधीत विभागाला फोन केला पाहिजे. अन्य एकाने म्हटलं, या मुलांसाठी मी फक्त प्रार्थना करू शकते.