विनामास्क घराबाहेर पडताय? मग मुंबई पोलिसांच्या कारवाईला तयार रहा

मुंबई तक

मुंबईसह राज्यभरातील महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. विदर्भातील अमरावती, अकोला या भागांमध्ये जिल्हा प्रशासनाने लॉकडाउनची घोषणा केली आहे. मुंबई, पुणे, नाशिक या भागांत अद्याप लॉकडाउनची घोषणा झाली नसली तरीही स्थानिक प्रशासनाने संचारबंदीचे नियम लागू करत निर्बंध कडक केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही रविवारी संध्याकाळी जनतेशी संवाद साधत वाढती रुग्णसंख्या आणि […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबईसह राज्यभरातील महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. विदर्भातील अमरावती, अकोला या भागांमध्ये जिल्हा प्रशासनाने लॉकडाउनची घोषणा केली आहे. मुंबई, पुणे, नाशिक या भागांत अद्याप लॉकडाउनची घोषणा झाली नसली तरीही स्थानिक प्रशासनाने संचारबंदीचे नियम लागू करत निर्बंध कडक केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही रविवारी संध्याकाळी जनतेशी संवाद साधत वाढती रुग्णसंख्या आणि लोकांकडून होत असलेल्या नियमांच्या उल्लंघनाबद्दल चिंता व्यक्त केली. प्रत्येकाने मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि सॅनिटायजरने हात स्वच्छ धुणं गरजेचं असल्याचं मत उद्धव ठाकरे म्हणाले.

आजही मुंबईत अनेक जण मास्क न लावता रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. अशा लोकांवर कारवाई करुन दंड आकारण्याचे अधिकार आता मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली.

राज्यातील जनतेशी संवाद साधतानाही उद्धव ठाकरे यांनी पुढील ८ ते १० दिवस मी वाट पाहीन आणि नंतर लॉकडाउनचा निर्णय घेईन असं सांगितलं आहे. अमरावती, अकोला या भागात जिल्हा प्रशासनाने लॉकडाउन जाहीर केलं आहे. मुंबईतही ५ पेक्षा जास्त रुग्ण आढळणाऱ्या सोसायट्या सील केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आता पुन्हा एकदा लॉकडाउनच्या उंबरठ्यावर येऊन उभा राहिला आहे. असंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भाषणानंतर दिसून येत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp