Maharashtra Bandh झाला आता पोलीस कारवाईला सुरुवात, २०० हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लखीमपूर खिरी येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ राज्यात आज एक दिवसाच्या बंदची घोषणा करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी या बंदत सहभागी होऊन दुकानं बंद राहतील याची काळजी घेतली. महाराष्ट्रासह मुंबईत काही ठिकाणी तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून तुरळक हिंसाचाराच्या घटना घडल्या.

ADVERTISEMENT

दुपारी चार वाजल्यानंतर हा बंद संपल्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. मुंबईच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये २०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra Bandh : ‘शिवभोजन थाळी’ देणाऱ्या हॉटेलचीच शिवसैनिकांकडून तोडफोड, चंद्रपुरातली घटना

हे वाचलं का?

मुंबईच्या कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये IPC १८८, २६९, २७० आणि विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी १४ जणांना ताब्यात घेतलं आहे. तर दुसरीकडे समता नगर पोलीस ठाण्यातही विविध कलमाअंतर्गत १४ जणांना ताब्यात घेतलं आहे. याव्यतिरीक्त धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, पोलीस स्टेशनमध्ये बसची तोडफोड केल्याप्रकरणी तीन NC दाखल करण्यात आल्या आहेत.

Maharashtra Bandh: ‘बंद’ करण्यावरून तुफान हाणामारी, महाविकास आघाडी आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले

ADVERTISEMENT

याचसोबत मुंबईच्या कफ परेड, डी.बी.मार्ग, नागपाडा, भायखळा, वरळी, दादर, माहिम, धारावी, खेरवाडी, कांदिवली, कुरार, कस्तुरबा, समता नगर अशा विविधी पोलीस स्टेशनमध्ये २०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबईसह ठाणे आणि नजिकच्या परिसरात बंद दरम्यान राजकीय कार्यकर्त्यांनी काही बसती तोडफोड करुन रिक्षावाल्यांनाही मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT