जबरदस्त… मुंबई पोलिसांच्या ‘या’ कामाला तोड नाही!
मुंबई: मुंबई पोलीस हे अतिशय कल्पकपणे सोशल मीडियाचा वापर करुन जनतेमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. रस्ते सुरक्षा ते कोरोना गाईडलाईन्सपर्यंतचे अनेक मेसेज मुंबई पोलिसांनी अत्यंत खुबीने जनतेपर्यंत पोहचवले आहेत. आता पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी अतिशय कल्पकपणे हात धुण्याबाबतचा मेसेज पोहचवला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबई पोलिसांचे सोशल मीडियावरील […]
ADVERTISEMENT
मुंबई: मुंबई पोलीस हे अतिशय कल्पकपणे सोशल मीडियाचा वापर करुन जनतेमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. रस्ते सुरक्षा ते कोरोना गाईडलाईन्सपर्यंतचे अनेक मेसेज मुंबई पोलिसांनी अत्यंत खुबीने जनतेपर्यंत पोहचवले आहेत. आता पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी अतिशय कल्पकपणे हात धुण्याबाबतचा मेसेज पोहचवला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबई पोलिसांचे सोशल मीडियावरील पेज हे आपल्या चांगला आशय आणि मजेदार पद्धतीने मेसेज शेअर करण्यासाठी प्रसिध्द आहे. यावेळी त्यांनी कोरोनापासून बचाव करण्याचा एक मेसेज पोहचविण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाच्या क्लिपचा मजेशीरपणे वापर केला आहे.
ADVERTISEMENT
कोरोनाविरूद्धच्या युद्धामध्ये सतत हात धुणे किती फायद्याचे आहे हे सांगण्यासाठी मुंबई पोलिसांनी अमिताभ बच्चन यांचा प्रसिद्ध चित्रपट ‘अग्निपथ’मधील एका सीनचा उपयोग केला आहे. ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांना त्यांची हात धुण्यास सांगत आहे. हाच व्हिडीओ शेअर करताना मुंबई पोलिसांनी कॅप्शन दिले आहे, ‘तुमच्या आईला काय आवडते हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का?’
मुंबई पोलिसांनी शेअर केलेल्या या सीनला सोशल मीडियावर बऱ्याच प्रतिक्रिया मिळत आहेत. लोकांना हा व्हिडिओ फार आवडल्याचं देखील यावरुन दिसत आहे. आतापर्यंत 7 हजाराहून अधिक लोकांनी ही पोस्ट लाइक केली आहे आणि बऱ्याच प्रमाणावर कमेंट देखील केल्या आहेत.
हे वाचलं का?
Kya aapne kabhi jaanane ki koshish ki, ki Ma ko kya pasand hai?#PathToSafety #MaKiSuno #MomsAlwaysRight #TakingOnCorona pic.twitter.com/prIxyiQJSN
— Mumbai Police (@MumbaiPolice) February 21, 2021
एका सोशल मीडिया यूजरने अशी कमेंट केली आहे की, ‘होय, आई नेहमीच बरोबर असते.’ तर दुसऱ्या यूजरने असं म्हटलं आहे की, ‘खूपच क्रिएटिव्ह’. एखादा जनजागृती करणारा मेसेज अशा पद्धतीने जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मुंबई पोलिस खूपच प्रसिद्ध आहेत. चित्रपटांच्या सीनपासून ते संवादापर्यंत अनेक गोष्टींचा वापर करुन ते योग्य तो मेसेज नेहमीच जनतेपर्यंत पोहचवतात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT