अवघ्या अडीच हजार रुपयांसाठी ओला चालकाची दगडाने ठेचून हत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ठाणे: अवघ्या अडीच हजार रुपयांसाठी आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील शिळ-डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. ठाण्यातील दिवा परिसरातील खर्डी रोडवर हा प्रकार घडला आहे.

ADVERTISEMENT

हत्या झालेला तरुण हा ओला गाडीचा ड्रायवर होता. भाड्याने ओला गाडी बुक करून काही इसम दिवा येथे जाण्यासाठी गाडीत बसले आणि दिवा जवळील खर्डी रोडवर लघुशंका करण्याच्या बहाण्याने गाडी थांबवत त्यांनी पैशांसाठी तरुणाला गाडीच्या खाली उतरवलं. पण पैसे न दिल्याने आरोपींनी ड्रायव्हरच्या डोक्यात दगड आणि पेव्हरब्लॉक मारून त्याची हत्या केली.

नेमकी घटना काय?

हे वाचलं का?

ठाण्यातील शिळ-डायघर पोलिसांना 29 मे रोजी सकाळी दिवा गावातील एका शेतकऱ्याने एका अज्ञात इसमाचा खून झाला असून त्याचे शव खर्डी रोडकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावरील ब्रिज खाली अर्धनग्न परिस्थितीत पडला असल्याची माहिती पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच शिळ-डायघर पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी पंचनामा केला असता मयत व्यक्तीच्या डोक्यात दगड आणि पेव्हरब्लॉक मारून त्याची हत्या केली असल्याचे निष्पन्न झाले. तसेच मृतदेहाजवळ एक ओला कंपनीची गाडी उभी असलेली पोलिसांना आढळून आली.

ADVERTISEMENT

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या, रक्ताच्या थेंबावरुन आरोपी अडकला पोलिसांच्या जाळ्यात

ADVERTISEMENT

तपासादरम्यान पोलिसांनी गाडीच्या नंबरवरून ओला कंपनीमार्फत मयताची ओळख पटवली. मयत ओला चालकाचे नाव मोहम्मद आली अन्सारी असून तो घाटकोपर मुंबई येथील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी लगेच तांत्रिक यंत्रणाच्या मदतीने तपालासा सुरुवात केली असता पोलिसांनी अवघ्या 10 तासात आरोपींना गजाआड केले आहे.

या प्रकरणात पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. हसिरूल हालीम शेख 36, आतिश भोसले 21, ओंकार कासेकर 21 आणि प्रशांत पेरिय 19 या चार जणांना अटक केली आहे. तर यात एक अल्पवयीन आरोपीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या पाचही जणांना पोलिसांनी ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अटक केलेल्या आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपींना गांजा आणि नशेची लत आहे. आरोपींनी बदलापूर येथून दिवा येथे येण्यासाठी ओला गाडी बुक केली. गाडी दिवानजीक आल्यानंतर आरोपींनी गाडी खर्डी रोडजवळ लघुशंका करण्यासाठी थांबवली. नशा करण्यासाठी आरोपींना पैसे हवे होते म्हणून त्यांनी ओला चालकालाच मारहाण करण्यास सुरुवात केली.

ओला चालकाच्या खिशातून आरोपींनी अडीच हजार रुपये आणि मोबाइल फोन जबरदस्तीने काढून घेतला. मयत ओला चालकाने प्रतिकार केला असता आरोपींनी त्याच्या डोक्यात दगड आणि पेव्हरब्लॉकने जोरदार प्रहार करून त्याची हत्या केल्याचे उघड झाले. फक्त नशा करण्यासाठी या आरोपींनी ओला चालकाची हत्या केली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून या आरोपींनी याआधी अशा प्रकारे काही गुन्हे केले आहेत का? याचा तपास शिळ-डायघर पोलीस करत असल्याची माहिती कळवा मुंब्राचे सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT