बाईईईई! किती महाग ते सोनं...आजही खरेदीदारांना फोडलाय घाम, भाव तर वाचा

मुंबई तक

Today Gold Rate : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठे बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज शुक्रवारी 6 जून 2025 रोजी पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

ADVERTISEMENT

सोन्याचा भाव, चांदीचा दर, सोने किती स्वस्त झाले, आज सोन्याचा चांदीचा दर, आज सोन्याच्या दरात घसरण, चंदीचा दर, सोना चंदीचा भाव
सोन्याचा भाव, चांदीचा दर, सोने किती स्वस्त झाले, आज सोन्याचा चांदीचा दर, आज सोन्याच्या दरात घसरण, चंदीचा दर, सोना चंदीचा भाव
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

point

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Today Gold Rate : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठे बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज शुक्रवारी 6 जून 2025 रोजी पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. माही काही दिवसांच्या तुलनेत 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत जवळपास 500 रुपयांनी वाढ झाल्याचं समोर आलं आहे. काल गुरुवारी जीएसटीसह सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 1 लाख रुपयांवर पोहोचली होती. 

देशाची राजधानी दिल्ली, मुंबई आणि जयपूरसारख्या प्रमुख शहरात 24 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅमचे दर 99700 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91300 रुपये झाली आहे. चांदीच्या दरातही वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज चांदीच्या भावात 2000 रुपयांनी वाढ झाली आहे. चांदीचे एक किलोग्रॅमचे दर 1,04,100 रुपये झाले आहेत. 

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय?

मुंबई

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99600 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 91300 रुपये झाले आहेत. 

पुणे 

पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99600 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 91300 रुपये झाले आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp