महाराष्ट्रातील विद्युत विभागात नोकरीची संधी; कसं कराल अप्लाय? जाणून घ्या, पात्रता आणि संपूर्ण माहिती
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (MSEDCL) कडून विद्युत क्षेत्रात वेगवेगळ्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. काय आहे अर्जाची प्रक्रिया? पात्रतेसह जाणून घ्या, संपूर्ण माहिती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महाराष्ट्रातील विद्युत विभागात नोकरीची संधी
MSEDCL कडून एकूण 249 पदांसाठी भरती जाहीर
काय आहे पात्रता आणि अर्जाची संपूर्ण प्रक्रिया?
Govt Job: ITI (आयटीआय) मध्ये शिक्षण घेतलेले बरेचसे तरुण नोकरीच्या शोधात असल्याचं पाहायला मिळतं. अशा तरुणांसाठी विद्युत विभागातील नव्या भरतीची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म्हणजेच महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड (MSEDCL) कडून महाराष्ट्रातील तरुणांसाठी 249 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती इलेक्ट्रिशियन, वायरमॅन आणि सीओपीए सारख्या ट्रेड्समध्ये केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार mahadiscom.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. 10 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
किती पदांसाठी भरती?
- एकूण पदांची संख्या: 249
- इलेक्ट्रिशियन पदासाठी जागा: 110
- वायरमॅन: 109
- सीओपीए (COPA): 30
काय आहे पात्रता?
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून संबंधित ट्रेड्समध्ये आयटीआय (ITI) ची डिग्री असणं अनिवार्य आहे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 27 वर्षे असणं आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
निवड प्रक्रिया
या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मेरिटच्या आधारे केली जाणार आहे. यासाठी कोणतीच लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. केवळ शैक्षणिक गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे.










