आरारारारा! मुंबई, ठाण्यात गारा पडणार? 'या' भागात मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट होणार
Mumbai And Thane Weather Today : मागील काही दिवसांपासून मुंबईत पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. मुंबईत यंदा मान्सून लवकर दाखल झाल्याने येथील हवामानात लक्षणीय बदल झाल्याचं पाहायला मिळालं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईत कोणत्या भागात पडणार मुसळधार पाऊस?
रेल्वेच्या वेळापत्रकावर होणार परिणाम?
मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात कसं असेल आजचं हवामान?
Mumbai And Thane Weather Today : मागील काही दिवसांपासून मुंबईत पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. मुंबईत यंदा मान्सून लवकर दाखल झाल्याने येथील हवामानात लक्षणीय बदल झाल्याचं पाहायला मिळालं. भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि एमएमआरडीए परिसरासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
मुंबईत पावसाची संततधार सुरुच राहिली तर काही भागात वाहतूक आणि पाणी साचण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे रेल्वे प्रवासाच्या वेळापत्रकावरी याचा परिणाम होऊ शकतो. अशातच आज 6 जून 2025 रोजी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात हवामानाची काय स्थिती असणार आहे, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
हवामानाची सामान्य स्थिती:
आकाश: आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे, काही वेळा पूर्णपणे ढगाळ वातावरण असू शकते.
पाऊस: हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, विशेषतः दुपारनंतर किंवा संध्याकाळी. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण साधारण 5 ते 20 मिमी दरम्यान असू शकते, परंतु स्थानिक परिस्थितीनुसार यात बदल होऊ शकतो.










