Nitin Gadkari: Nagpur मधील सर्व Petrol पंप बंद व्हावे ही माझी मनापासून इच्छा: गडकरी
योगेश पांडे, नागपूर ‘नागपूर शहरातून पेट्रोल आणि डिझेलचे सर्व पंप बंद व्हावे अशी माझी मनापासून इच्छा आहे.’ असं मत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. सर्व नागपूरकरांनी सीएनजी (CNG) आणि एलएनजीचा (LNG) वापर करावा. असंही गडकरी यावेळी म्हणाले. एका कार्यक्रमात बोलताना गडकरी असं म्हणाले की, ‘नागपूर शहरातून पेट्रोल आणि डिझेलचे सर्व पंप बंद […]
ADVERTISEMENT

योगेश पांडे, नागपूर
‘नागपूर शहरातून पेट्रोल आणि डिझेलचे सर्व पंप बंद व्हावे अशी माझी मनापासून इच्छा आहे.’ असं मत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. सर्व नागपूरकरांनी सीएनजी (CNG) आणि एलएनजीचा (LNG) वापर करावा. असंही गडकरी यावेळी म्हणाले.
एका कार्यक्रमात बोलताना गडकरी असं म्हणाले की, ‘नागपूर शहरातून पेट्रोल आणि डिझेलचे सर्व पंप बंद व्हावे अशी माझी मनापासून इच्छा आहे. त्यांच्या मंत्रालयाने त्यासाठी एक पॉलिसी आणली आहे. तसेच सीएनजी पंप नागपुरात लागल्यामुळे मारुती कंपनीच्या 1000 गाड्यांचे बुकिंग झाले.’
गडकरी पुढे असंही म्हणाले की, ‘येत्या सहा महिन्यात 100 टक्के शंभर टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आम्ही आणतो आहोत. पेट्रोल 110 रुपये आणि इथेनॉल 65 रुपये आहे. त्यामुळे लोकांच्या पैशाची बचत होणार आहे.’










