नागपूर: इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीवर प्रियकरासह तिघांकडून सामूहिक बलात्कार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

योगेश पांडे, नागपूर

ADVERTISEMENT

नागपूरमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर प्रियकरासह तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. प्रेमसंबंधातून मित्राने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर प्रियकराच्या दोन मित्रांनीही बलात्कार केल्याची तक्रार अल्पवयीन विद्यार्थीनीने नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

जरीपटका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष बकाल यांनी ‘मुंबई Tak’ला दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने आधी प्रियकराविरुद्ध बलात्काराचा तक्रार दिली. नंतर आणखी दोघे या कृत्यात सहभागी असल्याचं तिने पोलिसांना सांगितल्यामुळे पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली.

हे वाचलं का?

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये यश कांबळे, बिट्टू खोब्रागडे आणि रक्षित खोब्रागडे यांचा समावेश आहे. आरोपी बिट्टू आणि रक्षित हे दोघेही भाऊ आहेत.

यवतमाळ : गुप्तधनासाठी पोटच्या मुलीचा नरबळी देण्याचा प्रयत्न, नराधम बापासह 8 जणांना अटक

ADVERTISEMENT

या प्रकरणातील पीडित तरुणी नागपुर जिल्ह्यातील बुटीबोरी येथील एका महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाची विद्यार्थीनी आहे. ती तिच्या मैत्रीणीसह बुटीबोरी येथेच रूम करून राहते.

ADVERTISEMENT

यश कांबळे नामक तरुणासोबत तिचे प्रेम संबंध होते. सुमारे आठ दिवसांपूर्वी यशने पीडित तरुणीला त्याच्या रूम वर बोलावले होते. तिथे दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर बाजूच्या खोलीत लपून असलेल्या आणखी दोघांनी तरुणीवर बलात्कार केला.

बीडमध्ये अस्वस्थ करणारी घटना! पुण्यातील महिलेवर नात्यातील तरुणांकडून सामूहिक बलात्कार

दोन दिवसांपूर्वी आरोपी यश पीडित तरुणीच्या खोलीवर गेला. तिच्याकडे त्याने पुन्हा शारीरिक संबंधाची मागणी केली. यावेळी तरुणीने त्याला नकार दिला. नकार दिल्याने यश संतापला. रागाच्या भरात त्याने तिला शिवीगाळ केली.

याप्रकाराने पीडित तरुणीही चिडली. तिने फोन करून आईला सर्व प्रकार सांगितला. तरुणीची आई तिला घेऊन लागलीचं जरीपटका पोलीस ठाण्यात दाखल आली आणि यश कांबळे विरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली.

बलात्कारची तक्रार सामूहिक बलात्कारात बदलली

पीडित तरुणीने सुरुवातीला तिचा मित्र यश कांबळे विरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर त्या अनुषंगाने जरीपटका पोलिसांनी तपास सुरू केला होता. मात्र वैद्यकीय तपासणीसाठी गेल्यानंतर तरुणीने तिच्यावर एक नाही, तर तिघांनी बलात्कार केल्याचं डॉक्टरांना सांगितलं.

डॉक्टरांनी ही माहिती जरीपटका पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीचा नव्याने जबाब नोंदवून सामूहिक बलात्कार प्रकरणात आणखी दोघांना अटक केली आहे. एकूण तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT