Nagpur पोलिसांनी भरला Auto चालकाचा 2 हजारांचा दंड, कारण वाचून तुमचेही डोळे पाणावतील
योगेश, पांडे, प्रतिनिधी, नागपूर समाजामध्ये पोलिसांना अनेकदा नावं ठेवली जातात. खास करून वाहतूक पोलीस असेल तर पैसे घेतातच असा समज आहे. मात्र नागपूरमध्ये घडलेल्या एका घटनेने पोलिसांमधल्या माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. पांढऱ्या कपड्यात वाहतूक पोलीस दादा उभा दिसल्यास वाहतूक नियम न पाळणारे एकतर रस्ता बदलतात… किंवा पळ काढण्याचा प्रयत्न करतात… मात्र, नागपूरात एका ऑटो चालकाला […]
ADVERTISEMENT

योगेश, पांडे, प्रतिनिधी, नागपूर
समाजामध्ये पोलिसांना अनेकदा नावं ठेवली जातात. खास करून वाहतूक पोलीस असेल तर पैसे घेतातच असा समज आहे. मात्र नागपूरमध्ये घडलेल्या एका घटनेने पोलिसांमधल्या माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. पांढऱ्या कपड्यात वाहतूक पोलीस दादा उभा दिसल्यास वाहतूक नियम न पाळणारे एकतर रस्ता बदलतात… किंवा पळ काढण्याचा प्रयत्न करतात… मात्र, नागपूरात एका ऑटो चालकाला वाहतूक पोलिसांच्या संवेदनशीलतेचा वेगळाच अनुभवायला मिळाला…. जेव्हा खुद्द पोलिसांनी त्या ऑटो चालकाचा दोन हजारांचा दंड स्वतः भरला….
नागपूरच्या कामठी भागात राहणारे रोहित खडसे नावाचे ऑटो चालक कोरोना महामारी, वारंवार लागणारे लॉकडाऊनमुळे आधीच त्रस्त होते… बाजारपेठ, स्कूल कॉलेज सर्वकाही बंद असल्याने ऑटो चालवून मिळणाऱ्या उत्पन्नात चार सदस्यांच्या कुटुंबाचा पोट भरणे कठीण झाले होते… त्यात 9 ऑगस्ट रोजी बर्डी परिसरात त्यांनी चुकून नो पार्किंग मध्ये त्यांचे ऑटो उभे केले आणि परिसरात वाहतूक नियंत्रण करणाऱ्या वाहतूक पोलिसांनी त्यांच्या ऑटोवर नो पार्किंग संदर्भात 500 रुपयांचा दंड लावला. संगणकीकृत प्रणालीतून रोहित यांच्या ऑटोवर आधीचे ही दोन दंड असल्याचे कळले… त्यामुळे दंडाची एकूण रक्कम दोन हजार झाली…. वाहतूक पोलिसांनी कर्तव्य म्हणून रोहित यांच्याकडे दोन हजारांच्या दंडाची रक्कम मागितल्यावर रोहित याने तेवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगितले… त्यामुळे वाहतूक पोलिसांना नाइलाजास्तव रोहित यांचे ऑटो जप्त करावे लागले…
नुकत्याच बाजारपेठा सुरु झाल्यामुळे नेमकं कमाईच्या दिवसात ऑटो पोलिसांकडून जप्त झाल्याने रोहित समोर भविष्याच्या आर्थिक संकटाचे प्रश्नही निर्माण झाले… त्याने मित्रांकडे उसने पैसे मागितले, मात्र प्रत्येकाची अवस्था तशीच असल्याने त्याला कुठून ही पैसे मिळाले नाही. अखेर रोहितने जड अंतःकरणाने स्वतःच्या 7 वर्षांच्या मुलाच्या पिगी बँकमधून (गल्ल्यात साठवलेले पैसे) पैसे काढण्याचे ठरविले…. लहानग्यांची पिगी बँक तोडून त्याचे मन मोडण्याचे उद्दिष्ट नसताना ही पोटाची खळगी भरण्यासाठी ऑटो सोडविणे आणि त्यासाठी दोन हजारांचे दंड भरणे आवश्यक होते… त्यामुळे रोहितला दंडाची रक्कम भरण्यासाठी आपल्या चिमुकल्या मुलाची पिगी बँक फोडावी लागणार होती.










