Nagpur: फडणवीसांचा निकटवर्तीय, BJP नेत्याच्या मुलाकडून स्कोअररला मारहाण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Nagpur scorer brutally beaten up by son of bjp leader: नागपूर: भाजपचे (BJP) नेते आणि महाराष्ट्र राज्य बांधकाम मंडळाचे माजी अध्यक्ष मुन्ना यादव (Munna Yadav) यांचा मुलगा करण यादव (Karan Yadav) याने नागपुरात (Nagpur) सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील क्रिकेट सामन्यादरम्यान स्कोअररलाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुन्ना यादव हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे. (nagpur scorer brutally beaten up by son of bjp leader munna yadav who is close to devendra fadnavis)

नागपुरातील छत्रपती नगर येथील क्रिकेट मैदानावर खासदार क्रीडा महोत्सव अंतर्गत क्रिकेट सामने सुरू आहेत. याच दरम्यान करण यादव याने स्कोअररला मारहाण करत राडा केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

नागपूर : …अन् दोन दिवसाच्या बाळाला बापाने आदळलं फरशीवर

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या मारहाणीचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. शुक्रवारी दुपारी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले. व्हिडिओमध्ये करण यादव हा स्कोअरर अमित नावाच्या युवकाला मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. पाठलाग करून करण याने अमितला मारहाण केल्याचं यावेळी पाहायला मिळत आहे.

मुन्ना यादवांची बड्या नेत्यांशी थेट ओळख असल्यामुळे यात पोलीस कारवाई करणार का? हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

ADVERTISEMENT

Nagpur Police: बेरोजगार तरुणांना रेल्वे, SBI आणि WCL चे कॉल लेटर द्यायचे अन्…

ADVERTISEMENT

नेमका वाद काय

गुरुवारी नागपुरातील छत्रपती नगर येथे खासदार क्रीडा महोत्सव अंतर्गत इलेव्हन स्टार आणि खामला स्टार यांच्यात क्रिकेटचा सामना सुरू होता. मुन्ना यादवचा मुलगा करण आणि त्याच्या साथीदारांनी थ्रो बॉलवरून अंपायरच्या निर्णयावर वाद घालण्यास सुरुवात केली.

हे पाहून सामन्याचा स्कोअरर अमित होशिंग याने करणला सामन्याच्या नियमांचा हवाला दिला. त्यावरून करणने अमितला शिवीगाळ करत थेट त्याच्यावर बॅटने हल्ला केला. यावेळी अमित घाबरून पळू लागला तेव्हा करणने धावत जाऊन त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

मुन्ना यादव आणि कुटुंबीय यापूर्वीही दादागिरीच्या घटनांमुळे नागपूर शहरात चर्चेत राहिले आहेत. मात्र आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती असलेले मुन्ना यादव यांच्या मुलाने केलेली मारहाण कॅमेऱ्यात सुद्धा कैद झाली आहे. अशावेळी आता नागपूर पोलीस या सगळ्या प्रकरणात नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT