राहुल, सोनिया गांधींच्या भेटीनंतर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 2024 पर्यंत महाराष्ट्रात काँग्रेस हा क्रमांक 1 चा पक्ष बनवणार असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे.

ADVERTISEMENT

2024 पर्यंत आपण हे लक्ष्य गाठू असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसची सूत्रं हाती घेतल्यानंतर समोर आलेलं त्यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जातं आहे. नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षपदी होते. त्यांनी चार दिवसांपूर्वी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाप्रमाणे या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेक्षाध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नाना पटोले यानी 2014 मध्ये भंडारा-गोंदिया मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली. मात्र पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आतच नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टीकेचे ताशेरे झाडत पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.

हे वाचलं का?

2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले हे एक आक्रमक आणि धडाडीचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आज सोनिया गांधी आणि राहुल गांधींची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्रात काँग्रेस क्रमांक 1 चा पक्ष करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT