Crime : शेतकरी महिलेची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे; ओलांडली क्रूरतेची सीमा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Crime News in nashik district and malegaon tahasil :

ADVERTISEMENT

मालेगाव : तालुक्यातील दहिदी गावातून संपूर्ण राज्याला हादरवणारी घटना समोर आली आहे. गावातील शेतात काम करणाऱ्या शेतकरी महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या (Farmer’s wife was killed brutaly) तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन फेकून दिल्याचं भयंकर प्रकार घडला आहे. याप्रकरणी तालुका पोलिस स्टेशनमध्ये (Police Station) अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Nashik district and Malegaon Crime | Farmer’s wife was killed brutally)

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दहिदी येथील शेतकरी महिला सुमनबाई भास्कर बिचकुले ही महिला शेतात एकटीच काम करीत होती. तर तिचे पती भास्कर हे मका विक्रीसाठी बाजारात गेले होते. कांद्याना पाणी भरण्याचं काम करत असतानाच अज्ञात व्यक्तीने सुमनबाई यांच्यावर फावड्याने हल्ला केला. अज्ञाताने सुरुवातील सुमनबाईच्या दोन्ही पायांचे तुकडे केले. त्यानंतर या क्रूर अज्ञाताने फरफटत सुमनबाईला जंगलाच्या दिशेने नेलं.

हे वाचलं का?

Union Budget 2023 : अर्थसंकल्पातील हे आहेत महत्वाचे मुद्दे

तिथं त्याने सुमनबाईंच्या छातीवर आणि गळ्यावर जोरदार वार केले. तसंच, त्यांचं शीर धडावेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तो तेथून फरार झाला. भास्कर बिचकुले घरी आल्यानंतर त्यांनी शेतात पाहिलं असता सुमनबाई दिसल्या नाहीत. त्यांनी बरीच शोधाशोध केली. अखेर त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीनं शोध घेतला असता शेतालगत असलेल्या जंगलात सुमनबाईच्या शरीराचे तुकडे छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले.

ADVERTISEMENT

Union Budget 2023 : अर्थसंकल्पात काय स्वस्त अन् काय महाग? पाहा…

ADVERTISEMENT

या भयंकर घटनेची माहिती मिळताच तालुक्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामान करुन तपासाचे आदेश दिले. याप्रकरणी तालुका पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्येचं प्रकरण देशभरात गाजलं होतं. आरोपी आफताबने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केले होते. अशाच धर्तीवर झालेल्या या हत्येनं नाशिकसह राज्यभरात खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT