Manas Pagar : आनंदाच्या दिवशीही सत्यजीत तांबे हळहळले! “विजयोत्सव साजरा करणार नाही”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Manas Pagar | MLC Election Update 2023 :

ADVERTISEMENT

नाशिक : विधानपरिषदेच्या पाच जागांसाठीचे निकाल जाहीर होत आहेत. यापैकी नाशिकच्या जागेवरुन सत्यजीत तांबे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. सत्यजीत तांबे यांनी जवळपास 21 हजार मतांची आघाडी घेतली आहे. तांबेंना 45 हजार 660 मतं मिळाली आहेत. तर विरोधी उमेदवार शुभांगी पाटील यांना 24 हजार 927 मतं मिळाली आहेत. आतापर्यंत 1 लाख 29 हजार 456 मतांपैकी 84 हजार मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता तांबे यांच्या विजयाची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. (The results for five Legislative Council seats are being announced. Among these, Satyajit Tambe is on the verge of victory from Nashik seat)

विजयोत्सव साजरा न करण्याचा निर्णय :

मात्र विजयाच्या उंबरठ्यावर असलेल्या तांबे यांनी विजयोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तांबे यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मानस पगार यांच नुकतचं अपघाती निधन झालं आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आनंदोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. याशिवाय निकाल जाहीर होण्यापूर्वी तांबेंनी मानस पगार याच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचही सांत्वन केलं.

हे वाचलं का?

Manas Pagar: निकालाआधी सत्यजित तांबेंवर आघात! शेवटपर्यंत पाठिशी…

ट्विट करुन सत्यजीत तांबे म्हणाले, विजयाच्या आपण अगदी जवळ आहोत, पण विजयोत्सव साजरा करणार नाही, माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय, त्यामुळे कोणताही आनंदोत्सव नाही. सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, कृपया संयम राखावा. मी ३ ते ७ फेब्रुवारीला संगमनेर येथे सर्वांना भेटणार आहे, त्यामुळे कोणतीही घाई करु नये, ही विनंती.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

तर मानस पगार यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर ते म्हणाले, मानस पगार माझा सहकारी होता, युवक काँग्रेस मध्ये आणन्यासाठी मीच पुढाकार घेतला होता. या निवडणुकीत माझी बाजू खांबीर पणे मांडत होता. महाराष्ट्रात चांगला मित्र परिवार होता. मृत सागर मानस याच्या परिवाराची भेट घ्यायला आलो होतो. मानस जाण्याचे जे दुःख आहे ते आमच्यासाठी मोठे आहे. त्यामुळे या निवडणुकीतील विजयाचा आनंद जरी असला तरी हा विजयोत्सव साजरा न करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.

MLC Election Result: तांबे की पाटील? अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष नाशिककडे

मानस पगार यांचा अपघाती मृत्यू :

नाशिक ग्रामीणचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचा अपघाती मृत्यू झाला. बुधवारी रात्री नाशिकच्या पंचवटी परिसरातील उड्डाण पुलावर झालेल्या भीषण अपघातात मानस पगार यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर नाशिकसह महाराष्ट्रभरातील काँग्रेस कार्यकर्ते आणि युवकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. आज सकाळी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीही पगार यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली होती.

निःशब्द करणारी बातमी; सत्यजित तांबे शोकाकूल

मानस पगार यांच्या निधनानंतर सत्यजित तांबे यांनी शोक व्यक्त केला आहे. “माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचं अपघाती निधन झालं. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे”, अशा भावना सत्यजित तांबे यांनी व्यक्त केल्या आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT