Parambir Singh यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, पोलीस अधिकाऱ्याचे गंभीर आरोप
मुंबई पोलिसांचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. ठाणे पोलीस आयुक्तपदी काम करत असताना परमबीर सिंग यांनी बेकायदेशीरपणे आपल्या कामात ढवळाढवळ केल्याचा आरोप नाशिक ग्रामीण पोलिसांत कार्यरत असलेल्या उप-अधिक्षक शामसुंदर निपुंगे यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी सांगितलं तसं काम केलं नाही म्हणून एका महिला हवालदाराच्या आत्महत्या प्रकरणात मला अडकवल्याचा आरोपही […]
ADVERTISEMENT
मुंबई पोलिसांचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. ठाणे पोलीस आयुक्तपदी काम करत असताना परमबीर सिंग यांनी बेकायदेशीरपणे आपल्या कामात ढवळाढवळ केल्याचा आरोप नाशिक ग्रामीण पोलिसांत कार्यरत असलेल्या उप-अधिक्षक शामसुंदर निपुंगे यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
परमबीर सिंग यांनी सांगितलं तसं काम केलं नाही म्हणून एका महिला हवालदाराच्या आत्महत्या प्रकरणात मला अडकवल्याचा आरोपही निपुंगे यांनी केला आहे. २०१६ ते ऑगस्ट २०१७ या काळात निपुंगे भिवंडी येथे वाहतुक शाखेत सहायक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर राज्य सरकारने सिंग यांच्याविरोधात चौकशी सुरु केली आहे. त्यातच निपुंगे यांनी केलेल्या आरोपांवरुन परमबीर यांच्या अडचणींमध्ये वाढ होत जाण्याची चिन्ह दिसत आहेत.
भिवंडी वाहतूक शाखेत येत असलेल्या नारपोली वाहतुक विभागात एका पोलीस निरीक्षकाने परमबीर यांच्यासोबत आर्थिक देवणा-घेवाण करत नियुक्ती करुन घेतल्याचा आरोपही निपुंगे यांनी केला आहे. हे पोलीस निरीक्षक मी सहायक आयुक्त असतानाही माझा कोणताही आदेश पाळत नसल्याचं निपुंगे यांनी सांगितलं. आर्थिक गैरव्यवहार, वाहन चालकांकडून पैसे, गोदाम मालकांकडून पैसे गोळा करणं या कामांमध्ये मी हस्तक्षेप केल्यामुळे माझ्यावर त्यांचा राग होता असंही निपुंगे म्हणाले.
हे वाचलं का?
सुभद्रा पवार या महिला पोलीस हवालदाराने आत्महत्या केली होती. काही दिवसांपूर्वी तिने आपल्याशी कामावर येत असलेल्या वैयक्तिक अडचणींबद्दल मोबाईलवरुन संवाद साधला होता. सुभद्रा पवार या वाहतूक शाखेत कार्यरत होत्या, पोलीस तपासात सुभद्रा पवार यांनी आत्महत्या नसून हत्या करण्यात आल्याचं पुरावे समोर आले होते. परंतू त्यांच्यासोबत माझ्या मोबाईल संभाषणाचा धागा पकडत मला या प्रकरणी गोवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप निपुंगे यांनी केला. निपुंगे यांच्या आरोपांमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून यावरुन परमबीर यांची चौकशी होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT