देवेंद्र फडणवीस आघाडी सरकारविरोधात आणखी एक बॉम्ब फोडणार
–योगेश पांडे, नागपूर मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याचं सरकारनं म्हटल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर घणाघाती हल्ला केला. दाऊदशी व्यवहार करणाऱ्यांना वाचवण्यासाठी अख्खं सरकार उभं राहिलं असा संदेश देशात जाईल, असं म्हणत फडणवीसांनी सरकारबद्दल आणखी एक गौप्यस्फोट करणार असल्याचं म्हटलं आहे. नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री […]
ADVERTISEMENT
–योगेश पांडे, नागपूर
ADVERTISEMENT
मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याचं सरकारनं म्हटल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर घणाघाती हल्ला केला. दाऊदशी व्यवहार करणाऱ्यांना वाचवण्यासाठी अख्खं सरकार उभं राहिलं असा संदेश देशात जाईल, असं म्हणत फडणवीसांनी सरकारबद्दल आणखी एक गौप्यस्फोट करणार असल्याचं म्हटलं आहे.
नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. सरकारच्या या भूमिकेवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अतिशय चुकीचा पायंडा या ठिकाणी पाडला जात आहे. कारण त्यांना कोणत्याही राजकीय गुन्ह्यामध्ये अटक झालेली नाही. टेरर फंडिंगशी संबंधित असलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक झालेली आहे. एनआयएने गुन्हा दाखल केला आहे. ईडीने मनी लाँडरिंगमध्ये अटक केलेली आहे.”
हे वाचलं का?
या व्यवहारानंतर मुंबईत तीन वेळा बॉम्बस्फोट झाले; फडणवीसांचं खळबळजनक विधान
“अशा परिस्थितीमध्ये एक मंत्री राजीनामा देणार नसतील आणि सरकार म्हणणार असेल की, मंत्री राजीनामा देणार नाही. घटनात्मक परिस्थिती याठिकाणी तयार होतेय. मी याच्यावर बोलणार नाही. मी एवढंच सांगेन देशामध्ये याचा अतिशय चुकीचा संदेश जाईल. दाऊदसोबत व्यवहार करणाऱ्यांना वाचवण्यासाठी अख्खं सरकार उभं राहिलं”, असं फडणवीस म्हणाले.
ADVERTISEMENT
“माझ्याकडे जी कागदपत्रं होती, ती सगळी ईडी, एनआयए यांच्यासह संबंधित यंत्रणांना पाठवली होती. त्याचा तपास झाला. ईडीच्या वकिलानी आज न्यायालयात सांगितलं की, दाऊदशी संबंधित नऊ ठिकाणांवर छापेमारी केली. त्यानंतर हे धागेदोर जुळले. हे अचानक तयार झालेलं प्रकरण नाही. त्यानंतर हे टेरर फंडिंग झाल्याचं समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मंत्री राजीनामा देणार नाही, अशी सरकारची भूमिका असेल, तर राजकारणाचा स्तर इतका खाली जाणार असेल, चुकीचा पायंडा पडणार आहे”, अशी टीका फडणवीस यांनी केली.
ADVERTISEMENT
मोठी बातमी! अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी
“संजय राऊत अलिकडच्या काळात जी भाषा वापरतात. ते काही बोलतात, त्यांना उत्तर देणं माझ्या स्तरात बसत नाही. त्यांचं ज्या स्तरात बोलणं आहे, त्याचं स्तरातील लोकं त्यांना उत्तरं देतील”, असा निशाणा फडणवीसांनी साधला.
“खोटे साक्षीदार आणि पुराव्यांबद्दल बोललं जात आहे. मी काही दिवसांत खुलासा करणार आहे. महाराष्ट्र सरकार कशा पद्धतीने खोटे साक्षीदार तयार करतंय, पुरावे तयार करतंय आणि सरकारची यंत्रणा खोटेपणा करून लोकांना आणि नेत्यांना फसवण्याचा प्रयत्न करतेय. सरकार षडयंत्र करत असून, मी यावर लवकरच खुलासा करणार आहे,” असा इशारा फडणवीसांना दिला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT