जामीनासाठी धडपडणाऱ्या नबाव मलिकांच्या अडचणीत भर, वाशिम कोर्टाने काय दिले निर्देश?
मनी लाँड्रिंग प्रकरणात सध्या तुरुंगात असलेल्या नवाब मलिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. समीर वानखेडेंशी संबंधित प्रकरणात मलिकांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासह चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश वाशिम सत्र न्यायालयाने पोलिसांना दिलेत. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचं शाब्दिक युद्ध रंगलं होतं. नवाब […]
ADVERTISEMENT

मनी लाँड्रिंग प्रकरणात सध्या तुरुंगात असलेल्या नवाब मलिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. समीर वानखेडेंशी संबंधित प्रकरणात मलिकांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासह चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश वाशिम सत्र न्यायालयाने पोलिसांना दिलेत.
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचं शाब्दिक युद्ध रंगलं होतं. नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळवल्याचाही आरोप केला होता.
समीर वानखेडे हे मुस्लीम असून, त्यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातून नोकरी मिळवल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता. या प्रकरणात नवाब मलिकांनी समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्यावरही गंभीर आरोप केले होते.
Nawab Malik यांच्यावर वानखेडेंनी टाकलेली डिफेमेशन केस म्हणजे काय? अब्रुनुकसानीचा दावा कधी करता येतो? समजून घ्या