मलिकांच्या कुटुंबाची उस्मानाबादेत १५० एकर जमीन, खरेदी करताना घोटाळा झाल्याचा भाजपचा आरोप
– गणेश जाधव, उस्मानाबाद प्रतिनिधी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या हस्तकाकडून मालमत्ता खरेदी प्रकरणात ईडीच्या रडारवर आलेल्या नवाब मलिकांच्या अडचणी कमी होत नाहीयेत. मलिकांना विशेष कोर्टाने ३ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झालेला आहे. अशातच मलिक यांच्या कुटुंबाच्या नावावर उस्मानाबाद जिल्ह्यात १५० एकर जमीन असून ही जमीन खरेदी करताना व मुल्यांकनादरम्यान घोटाळा […]
ADVERTISEMENT

– गणेश जाधव, उस्मानाबाद प्रतिनिधी
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या हस्तकाकडून मालमत्ता खरेदी प्रकरणात ईडीच्या रडारवर आलेल्या नवाब मलिकांच्या अडचणी कमी होत नाहीयेत. मलिकांना विशेष कोर्टाने ३ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झालेला आहे. अशातच मलिक यांच्या कुटुंबाच्या नावावर उस्मानाबाद जिल्ह्यात १५० एकर जमीन असून ही जमीन खरेदी करताना व मुल्यांकनादरम्यान घोटाळा झाल्याचा आरोप स्थानिक भाजप नेत्यांनी केला आहे.
इतकी जमीन खरेदी करण्यासाठी मलिकांकडे पैसा कुठून आला याचा तपासही ईडीने करावा अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केली आहे.
मलिक यांची पत्नी, मुलगी आणि मुलगा यांच्या नावावर ही जमीन असून गेल्या ८ वर्षांपासून ही जमीन पडीक असल्याचं कळतंय. उस्मामाबाद सारख्या ग्रामीण भागात तब्बल १५० एकर जमीन घेण्याचे प्रयोजन काय? यासह जमीन खरेदी करताना मूल्यांकन कमी दाखवून खरेदी खत केले व सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला. शेतकरी नसताना मलिक कुटुंबाने जमीन खरेदी केली अशा अनेक बाबी संशयस्पद असून इडीने याची चौकशी करावी अशी मागणी भाजपने केली आहे.