हिवाळी अधिवेशनात मोठ्या नेत्यांची नावं जाहीर करणार; नवाब मलिकांच्या माहितीने खळबळ
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करतानाच काही नेत्यांचे ड्रग्ज प्रकरणाशी कनेक्शन असल्याचा दावा केला आहे. त्या नेत्यांची नाव जाहीर करणार असल्याचं सांगत नवाब मलिक यांनी खळबळ उडवून दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना मलिक म्हणाले, ‘महिनभरात जी परिस्थिती होती. तशी आता राहिली नाही. परिस्थिती बदलल्यानंतर कालपासून भाजपचे नेते […]
ADVERTISEMENT

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करतानाच काही नेत्यांचे ड्रग्ज प्रकरणाशी कनेक्शन असल्याचा दावा केला आहे. त्या नेत्यांची नाव जाहीर करणार असल्याचं सांगत नवाब मलिक यांनी खळबळ उडवून दिली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना मलिक म्हणाले, ‘महिनभरात जी परिस्थिती होती. तशी आता राहिली नाही. परिस्थिती बदलल्यानंतर कालपासून भाजपचे नेते आणि त्यांचे राईट हॅण्ड समीर वानखेडेंना एनसीबी कार्यालयात भेटत आहेत. कासिफ खानला अटक झाल्यावर अनेकांची पोलखोल होईल आणि त्याच्याकडे किती लोकांचे पैसे आहे, हे उघड होईल’, अशी माहिती मलिकांनी दिली.
हे षडयंत्र… योगी आदित्यनाथांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही; नवाब मलिकांचा गंभीर आरोप
यामागे भाजप आहे का असा प्रश्न मलिकांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना मलिक म्हणाले, ‘माझ्याकडे काही हत्यारं राहुद्या. विधानसभा वादळी ठरणार आहे. आता बोलल्यानंतर काही लोक न्यायालयात जातील. विधानसभेत माझ्यावर जे काही आरोप होणार आहेत. त्याचं उत्तर देताना मी जे काही समोर आणेल, त्यानंतर राज्यातील काही नेत्यांना तोंड दाखवणं कठीण होऊन जाईल’, असा इशारा मलिकांनी दिला.









