नेपाळ दुर्घटना: ठाण्यातील जोडपं विखुरलेला संसार सावरायला गेले, अन्…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विक्रांत चौहान, ठाणे: नेपाळमधील पोखराहून जोमसोमला जाणाऱ्या प्रवासी विमानाचा काल (29 मे) अपघात झाला होता. या विमानात क्रू मेंबर्ससह एकूण 22 लोक होते. ज्यामध्ये ठाण्यातील चार जणांचाही समावेश होता. या अपघाताला 24 तासांहून अधिकचा वेळ उलटून गेलेला आहे. मात्र, या चारही जणांचा अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. या सगळ्यात ठाण्यातील चौघांबाबत एक नवी माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

त्रिपाठी दाम्पत्य गेलेले सावरायला पण…

ठाण्यातील माजिवडा येथे राहणारे त्रिपाठी कुटुंबीयपैकी त्यांची पत्नी वैभवी बांदेकर-त्रिपाठी पती अशोक त्रिपाठी तसेच त्यांचा मुलगा धनुष्य अणि रितीका अणि असे चौघेही नेपाळच्या टूरवर गेले होते.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, त्रिपाठी दाम्पत्य हे वेगळे राहत आहेत. त्यांनी घटस्फोटासाठी अर्जही केला होता. पण विभक्त होण्यापूर्वी न्यायालयाने त्यांना 10 दिवस एकत्र फिरण्याची मुभा दिली होती. कोर्टाने मुभा दिल्याने त्रिपाठी दाम्पत्य हे आपल्या दोन्ही मुलांसह नेपाळला फिरण्यास गेले होते.

दरम्यान, नेपाळ येथे विमान दुर्घटनेनंतर त्रिपाठी कुटुंबीय हे अद्यापही बेपत्ताच आहे. मागील 24 तासापासून त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. याप्रकरणी आता ठाणे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नेपाळच्या दूतावासाबरोबर संपर्क साधला जात आहे. त्यानंतर राज्य आपत्ती विभागबरोबर देखील ते चर्चा करण्यात येणार आहे. त्यांचे पासपोर्ट मुंबईमधील बोरिवली येथील होते.

ADVERTISEMENT

मात्र, मागील काही दिवसांपासून ते ठाण्यातील माजिवडा येथील रुस्तुमजी येथील इमारतीमधील पाहिल्या मजल्यावर राहत होते. मात्र, या चौघांचा अजूनही शोध लागलेला नाही. खरं म्हणजे नेपाळमध्ये झालेल्या अपघातानंतर या दाम्पत्याचं नेमकं काय झालं हे अद्यापही समजू शकलेलं नाही.

ADVERTISEMENT

नेमकी घटना काय?

नेपाळमधील पोखराहून जोमसोमला जाणाऱ्या प्रवासी विमानाचा काल अपघात झाला होता. या विमानात क्रू मेंबर्ससह एकूण 22 लोक होते. काल सकाळी 10.07 वाजल्यापासून विमानाशी कोणताही संपर्क झाला नसल्याचे विमानतळ प्राधिकरणाने सांगितले होते. अखेर दुपारी चारच्या सुमारास विमानाचे काही अवशेष सापडले होते. त्यामुळे आता विमानाचा अपघात झाल्याचं स्पष्ट झालं. घटनास्थळी सातत्याने स्थानिक प्रशासन तपास करत आहेत. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रमुख देखील याबाबत प्रशासनाशी संपर्कात आहेत. त्याचवेळी नेपाळच्या लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले की, नेपाळी सैन्य जमीन आणि हवाई मार्गाने घटनास्थळी रवाना झाले आहेत.

नेपाळमध्ये विमानाचा भीषण अपघात, 4 भारतीयांसह 22 जण होते विमानात

याआधी, जोमसोम विमानतळाच्या वाहतूक नियंत्रकाने सांगितले होते की ‘घासामध्ये एक मोठा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. परंतु याची पुष्टी होऊ शकलेली नाही. स्फोट झालेल्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे याचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवण्यात आले. स्फोटाच्या ठिकाणी विमानाचा शेवटचा संपर्क झाला होता.’ असेही त्यांनी सांगितले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT