मर्सिडीज गाडीत काय सापडलं? NIA ची पहिली प्रतिक्रिया, वाझेंच्या अडचणी वाढल्या
अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ प्रकरणात NIA च्या अटकेत असलेल्या वाझेंच्या अडचणीत आणखीच वाढ होणार आहे. सोमवारी रात्री NIA च्या पथकाने सचिन वाझेंच्या CIU ऑफिसची झाडाझडती घेतली. यावेळी NIA च्या पथकाला अनेक महत्वाचे पुरावे हाती लागले. यावेळी NIA च्या अधिकाऱ्यांनी एक मर्सिडीज गाडी ताब्यात घेतली होती. ही मर्सिडीज गाडीही सचिन वाझेच चालवत होत असल्याचं समोर […]
ADVERTISEMENT
अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ प्रकरणात NIA च्या अटकेत असलेल्या वाझेंच्या अडचणीत आणखीच वाढ होणार आहे. सोमवारी रात्री NIA च्या पथकाने सचिन वाझेंच्या CIU ऑफिसची झाडाझडती घेतली. यावेळी NIA च्या पथकाला अनेक महत्वाचे पुरावे हाती लागले. यावेळी NIA च्या अधिकाऱ्यांनी एक मर्सिडीज गाडी ताब्यात घेतली होती. ही मर्सिडीज गाडीही सचिन वाझेच चालवत होत असल्याचं समोर आलंय. या गाडीचा मालक कोण हे अद्याप समजू शकलेलं नाहीये.
ADVERTISEMENT
परंतू या गाडीची झाडाझडती घेतली असता, ५ लाखांपेक्षा जास्त रोख रक्कम, पैसे मोजायची मशिन आणि काही कपडे NIA ला सापडले आहेत. याचसोबत NIA ने काही नंबरप्लेटही ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात वाझे यांच्या अडचणींमध्ये अजून भर पडणार असल्याचं दिसतंय. NIA च्या मुंबई ब्रांचचे IG अनिल शुक्ला यांनी रात्री पत्रकारांना ही माहिती दिली.
सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA च्या हातात महत्वाचा पुरावा हाती लागला आहे. सचिन वाझे यांच्या ठाणे येथील साकेत सोसायटीचं सीसीटीव्ही फुटेज NIA च्या हाती लागलं आहे. मनसुख हिरेन यांच्याकडे असलेली स्कॉर्पिओ गाडी चोरीला गेल्यानंतर ती वाझे यांच्याकडे होती आणि ही कार वाझेंनी आपल्या सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये ठेवल्याचा NIA ला संशय होता. या पार्श्वभूमीवर NIA ने काल रात्री Crime Intelligence Unit च्या कार्यालयात छापे मारले.
हे वाचलं का?
या छापेमारीत NIA ने लॅपटॉप, फोन, साकेत सोसायटीमधल्या सीसीटीव्ही फुटेजचा DVR ताब्यात घेतला आहे. सचिन वाझे यांनी आपल्या सोसायटीमधील सीसीटीव्हीचा DVR काढून घेतला होता. याव्यतिरीक्त सचिन वाझे यांच्या केबिनमधून अनेक महत्वाची कागदपत्र NIA च्या हाती लागलेली आहेत. आतापर्यंत या प्रकरणातला हा सर्वात मोठा पुरावा NIA च्या हाती लागल्याचं बोललं जातंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT