मुंबईची खबर: MHADA कोकण बोर्डाच्या लॉटरीसाठी ‘इतके’ अर्ज! ‘या’ शहरात मिळतील घरे...

MHADA कोकण बोर्डाच्या लॉटरीत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी कालावधी संपण्याला अवघे 18 दिवस बाकी असताना, लॉटरीत समाविष्ट असलेल्या घरांच्या संख्येपेक्षा 18 पट जास्त अर्ज आल्याची माहिती समोर आली आहे.

MHADA कोकण बोर्डाच्या लॉटरीसाठी ‘इतके’ अर्ज!
MHADA कोकण बोर्डाच्या लॉटरीसाठी ‘इतके’ अर्ज!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

MHADA कोकण बोर्डाच्या लॉटरीसाठी ‘इतके’ अर्ज

point

कोणत्या शहरातील घरांचा समावेश?

Mumbai News: महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (MHADA) कोकण मंडळाच्या लॉटरीत लोकांचा ऊत्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे. लॉटरीत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी कालावधी संपण्याला अवघे 18 दिवस बाकी असताना, लॉटरीत समाविष्ट असलेल्या घरांच्या संख्येपेक्षा 18 पट जास्त अर्ज आल्याची माहिती समोर आली आहे.

म्हाडाच्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 5,285 घरांसाठी 93,694 अर्जदारांनी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली असून तर नोंदणी केलेल्या अर्जदारांपैकी 62,202 हून अधिक अर्जदारांनी ठेवीचे पैसे जमा करून त्यांचा दावा निश्चित केला आहे.

हे ही वाचा: मिठी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, तरुण गेला वाहून, धडकी भरवणारा Video व्हायरल

‘या’ शहरातील घरांचा समावेश  

कोकण बोर्डाच्या लॉटरीत ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा आणि मीरा रोड येथील घरांचा समावेश आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये कोकण बोर्डाच्या 2147 घरांसाठी एकूण 24,911 लोकांनी अर्ज केले होते.

मागील लॉटरीच्या तुलनेत दुप्पट अर्ज 

तसेच, 2025 च्या कोकण मंडळाच्या दुसऱ्या लॉटरीत, मागील लॉटरीच्या तुलनेत आतापर्यंत दुप्पट अर्ज आले आहेत. गेल्या वर्षी, मुंबई मंडळाच्या 2030 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. मुंबईतील म्हाडाच्या घरांची नोंदणी त्यांच्या नावावर करण्यासाठी 1,31,811 अर्ज प्राप्त झाले होते.

हे ही वाचा: मुंबईकरांची दाणादाण, 'या' भागांमध्ये गुडघाभर पाणी, अंधेरीतील सबवे बंद, धडकी भरवणारा पाऊस

28 ऑगस्टपर्यंत अर्ज... 

सध्याच्या कोकण बोर्ड लॉटरीला मिळालेला प्रतिसाद पाहता, यावर्षीच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या एक लाखाच्या जवळपास पोहोचू शकत असल्याचं चित्र दिसत आहे. कोकण बोर्डाच्या लॉटरीत सहभागी होण्यासाठी, अर्जदार 28 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन नोंदणी करू शकतात आणि पैसे जमा करू शकतात. लॉटरीचे निकाल 18 सप्टेंबर रोजी ऑनलाइन जाहीर केले जातील.

हे वाचलं का?

    follow whatsapp