रात्री 10 ते सकाळी 6 शहरात भोंग्यांना बंदी ! मुंबई पोलिसांचा महत्वाचा निर्णय
भोंग्यांवरुन राज्यात सुरु झालेलं राजकारण टिपेला पोहचलेलं असताना शहरातली कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात रहावी यासाठी मुंबई पोलिसांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यात रात्री 10 ते सकाळी सहा वाजेपर्यंत शहरात भोंगे वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आदेशानुसार यापुढे सायलेंट झोनमध्ये कोणालाही लाऊडस्पीकर, भोंगे लावण्याची परवानगी नसेल. याशिवाय रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत संपूर्ण […]
ADVERTISEMENT
भोंग्यांवरुन राज्यात सुरु झालेलं राजकारण टिपेला पोहचलेलं असताना शहरातली कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात रहावी यासाठी मुंबई पोलिसांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यात रात्री 10 ते सकाळी सहा वाजेपर्यंत शहरात भोंगे वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
मुंबई पोलिसांच्या आदेशानुसार यापुढे सायलेंट झोनमध्ये कोणालाही लाऊडस्पीकर, भोंगे लावण्याची परवानगी नसेल. याशिवाय रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत संपूर्ण मुंबईत लाऊडस्पीकर-भोंगे वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. या काळात जर कोणीही लाऊडस्पीकर किंवा भोंगे वाजवले तर त्यांच्यावर मुंबई पोलीस कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
१५ दिवसांत ७०० चिथावणीखोर पोस्ट सोशल मीडियावरून ‘डिलिट’; यशस्वी यादवांची धक्कादायक माहिती
हे वाचलं का?
सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी दिलेल्या आदेशाची मुंबई पोलिसांकडून आता सक्त अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक टीम ही तयार केली आहे. याव्यतिरीक्त कंट्रोल रूमवर ध्वनीप्रदूषणासंदर्भात जर एखादा कॉल आला तरीही कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
कायदा हातात घेऊ नका, संघर्ष वाढवू नका! दिलीप वळसे पाटील यांचा राज ठाकरेंना इशारा
ADVERTISEMENT
याचसोबत, मुंबई पोलिसांनी समाजविघातक कामं, जातींमध्ये चिथावणी करणाऱ्या गुन्हेगारांची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे. आयपीसी कलम 144, 149 आणि 151 अंतर्गत या समाजविघातक घटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. काही लोकांना आधीच यासंबंधी नोटीस बजावण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
असे आहेत मुंबई पोलिसांचे निर्देश –
-
अनेक मशिदी आणि मंदिरे कायदेशीररित्या बांधली गेली आहेत, परंतु जी बेकायदेशीर आहेत किंवा सर्व नियमांचे पालन न करता बांधलेली आहेत, त्यांना लाऊडस्पीकरची परवानगी दिली जाणार नाही.
-
मंदिर आणि मशिदींमध्ये लाऊडस्पीकरला परवानगी देताना, मुंबई पोलीस रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत ध्वनिप्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोर पालन होत असल्याचे सुनिश्चित करणार आहे.
-
ज्या धार्मिक संस्था सायलेंट झोनमध्ये नाहीत, त्यांनाच लाऊडस्पीकरची परवानगी असेल. यासोबतच लाऊडस्पीकरची परवानगी घेणारी मशीद किंवा मंदिराची रचना कायदेशीर आहे की, नाही हेही पाहिलं जाणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT