महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही-शरद पवार

मुंबई तक

परमबीर सिंग यांनी जे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे त्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याबाबत आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी त्यांची भूमिका मांडली. यामध्ये त्यांनी केलेलं एक महत्व अत्यंत महत्त्वाचं आहे. ते हेच आहे की या सगळ्या घडामोडीमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर काही परिणाम होणार नाही असं वक्तव्य […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

परमबीर सिंग यांनी जे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे त्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याबाबत आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी त्यांची भूमिका मांडली. यामध्ये त्यांनी केलेलं एक महत्व अत्यंत महत्त्वाचं आहे. ते हेच आहे की या सगळ्या घडामोडीमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर काही परिणाम होणार नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.

पत्रातून परमबीर सिंग यांचे गंभीर आरोप, पण खाली सहीच नाही ! राज्य सरकार चौकशी करणार

परमबीर सिंग हे बदलीच्या आधी मला भेटले होते. मला त्यांनी माझ्यावर अन्याय होतो आहे हे स्पष्ट केलं होतं. माझ्या काही निर्णयांमध्ये राजकीय ढवळाढवळ होत होती असंही त्यांनी मला सांगितलं होतं मात्र अनिल देशमुख यांचं थेट नाव घेतलं नव्हतं असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. अनिल देशमुख यांच्याबाबत एक ते दोन दिवसात निर्णय घेऊ असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत विचारलं असता तो निर्णय मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांशी चर्चा घ्यावा.

परमबीर यांचे गंभीर आरोप, अनिल देशमुख अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार !