Omicron: महाराष्ट्रात ओमिक्रॉनने भरवली धडकी, दिवसभरात सापडले 8 नवे रुग्ण; पुन्हा लॉकडाऊन?
मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा ओमिक्रॉनचे रुग्ण वाढू लागले आहेत आणि ही वाढ नक्कीच धडकी भरवणारे आहेत. आज राज्यात आठ नवीन रुग्ण आढळून आले आहेत ज्यांना ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचं समोर आलं आहे. चिंतेची बाब ही की, ओमिक्रॉन व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहेत. कारण आठपैकी सात रुग्ण हे मुंबईतच सापडले आहेत. दरम्यान, आता […]
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा ओमिक्रॉनचे रुग्ण वाढू लागले आहेत आणि ही वाढ नक्कीच धडकी भरवणारे आहेत. आज राज्यात आठ नवीन रुग्ण आढळून आले आहेत ज्यांना ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचं समोर आलं आहे. चिंतेची बाब ही की, ओमिक्रॉन व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहेत. कारण आठपैकी सात रुग्ण हे मुंबईतच सापडले आहेत. दरम्यान, आता महाराष्ट्रात ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 28 वर पोहोचली आहे.
महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढला
आतापर्यंत मुंबईत 12, चिंचवडमध्ये 10, पुण्यात 2 आणि डोंबिवलीत एक रुग्ण आढळून आला आहे. ज्यांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे.
दरम्यान, ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढत गेले तर महाराष्ट्रात लॉकडाऊन देखील लागू शकतो. त्यामुळे आता ही रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवून पुन्हा एकदा लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी ठाकरे सरकारला घ्यावी लागणार आहे.
